बारामती – कर्नाटकचे मुख्यमंत्री बोमाई महाराष्ट्रातील अनेक भागावर दावा सांगत आहेत.. महाराष्ट्र काय कोणाला आंदन म्हणून मिळाले नाही बोमाई हे त्यांच्या राज्याची बाजू घेऊन बोलतात याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मात्र मुग गिळून गप्प का आहेत.. त्यांनी आरेला का रे का करू नये… महाराष्ट्रातील अनेक भागातील लोक आमचा विकास करणार नसताल तर आम्ही शेजारच्या राज्यात जाऊ…असे लोक बोलून दाखवत आहेत अशी परिस्थिती या आधी महाराष्ट्रात नव्हती.. अशी भावना या लोकांच्या मनात का येऊ लागली याला जबाबदार कोण असा सवाल विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी उपस्थित केला…
विरोधी पक्ष नेते आज इंदापूर दौऱ्यावर होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर येथे शरद कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.. यावेळी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे, आमदार अमोल मिटकरी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते..पुढे बोलताना पवार म्हणाले की, देशातील बेरोजगारीचा दर 8.3% पर्यंत गेला आहे निवडणुकी वेळी नोकऱ्या उपलब्ध करून देतो अशा वल्गना केल्या … मात्र काही झालं नाही निवळ बुलबुलैया असं म्हणत जनतेने याबाबत विचार करावा.. असे म्हणत सीमा भागातील लोक शिंदे फडणीस सरकारवर विश्वास ठेवायला तयार नसल्याचे यावेळी पवारांनी सांगितले..