पश्चिम महाराष्ट्र

कर्नाटकच्या वाहनांना महाराष्ट्र पोलीसांचे संरक्षण

सोलापूर – प्रहारच्या आंदोलना नंतर ,कर्नाटकाच्या सर्व वाहनांना महाराष्ट्र पोलिसांकडून पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.कर्नाटक राज्यातील सार्वजनिक बसेस सोलापूर एसटी बस स्थानक क्रमांक 2 येथून रवाना होतात. हुबळी-बेळगाव, लातूर- बेळगाव, औरंगाबाद- बेळगाव तसेच अक्कलकोट मार्गावरून जाणाऱ्या व सोलापूर-विजयपूर महामार्गावरून जाणाऱ्या कर्नाटकच्या बसेसना महाराष्ट्र पोलीस दलातील प्रत्येकी दोन कॉन्स्टेबल कर्नाटक सीमेपर्यंत सुरक्षा प्रदान करणार आहेत.प्रहारने केलेल्या आंदोलनाची दखल घेत,पोलिस आयुक्तांनी ताबडतोब वाकी टॉकी वरून संदेश पाठविला आहे.

प्रहारने कर्नाटकचा निषेध करत एसटी बसेसला काळे फासले व इशारा दिला
प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकर्यांनी बुधवारी दुपारी सात रस्ता येथे अचानकपणे आंदोलन करत कर्नाटक सरकारचा व मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा निषेध केला. कर्नाटक बसेसवर जय महाराष्ट्र अशा घोषणा लिहल्या.तसेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला काळे फासून ,उद्यापासून कर्नाटकच्या बसेस महाराष्टात किंवा सोलापुरात येऊ देणार नाही,अन्यथा फोडण्यात येतील असा इशारा देण्यात आला आहे.

पोलीस आयुक्तांनी ताबडतोब कर्नाटकच्या बसेस व प्रवाशांना संरक्षण देण्याचे आदेश वाकी टॉकी वरून दिले
सात रस्ता येथे प्रहारच्या आंदोलनाची सोलापूर शहर पोलिसांनी ताबडतोब दखल घेतली आहे.कर्नाटक बसेस मध्ये प्रवाशांना कसल्याही प्रकारचा शारीरिक नुकसान होऊ नये,सार्वजनिक बसेसच नुकसान होऊ नये म्हणून संरक्षण देण्याचा निर्णय दिला आहे.महाराष्ट्र पोलीस दलातील किंवा सोलापूर शहर पोलीस दलातील दोन पोलीस कॉन्स्टेबल हे प्रत्येक कर्नाटक बस मध्ये कर्नाटक हद्दीपर्यंत जातील आणि परत येतील असा आदेश दिला आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment