रायगड – कोकणात रायगड जिल्ह्यात पोलादपूर तालुक्यात कोतवाल बुद्रुकच्या श्री काळकाई देवीच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाला भाजपाचे नेते आमदार प्रवीण दरेकर, खासदार सुनील तटकरे, व महाडचे आमदार भरत गोगावले हे एकत्र आले होते. यावेळी त्यांनी एकमेकाना चिमटे काढण्याची एकही संधी सोडली नाही हसत खेळत चिमटे काढत त्यांनी केलेल्या भाषणांनी एक उपस्थितांना पोट धरून हसायला ही लावले. भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी खासदार सुनील तटकरे यांचा सत्कार केला. तेव्हा खासदार सुनील तटकरे व दरेकर कानात म्हणाले की, जॅकेट ओरिजिनल तुमचेच! पुर्वी नेहरूंचे आता मोदींचे! तटकरे म्हणाले की महाडला जॅकेटबाबत बोललो त्यावर ठाम आहे… जॅकेट तुम्हीही घातले आहे तरी जॅकेट ओरिजिनल तुमचेच आहे. पुर्वी नेहरूंचे जॅकेट माहिती होते आता मोदींचे जॅकेट ओळखले जाते, असे सांगून खा. सुनील तटकरे यांनी उपस्थितांमध्ये हशा पिकविला. दोन दिवसापूर्वी खासदार सुनील तटकरे यांनी आमदार भरत गोगावले यांच्यावरती जॅकेट वरून टीका केली होती. याचा संदर्भ घेऊन सुनील तटकरे दरेकर यांना म्हणाले.
विस्तारात संधी…आले विस्तारवाले?
खा.तटकरेंच्या प्रश्नामुळे हास्यकल्लोळ
आगामी मंत्रीमंडळाच्या विस्तारामध्ये आ.प्रवीण दरेकरांना महत्वाचे स्थान मिळावे. असे उदगार खा.तटकरे यांनी भाषणात काढल्यानंतर आ.दरेकर यांनी यासाठी काळकाईदेवीची कृपा व्हावी, या अर्थाने अंगुलीनिर्देश केल्यानंतर खा. तटकरे यांनी आले काय विस्तारवाले? असा गोगावले यांचे नाव न घेता खोचक सवाल करून हास्यकल्लोळ निर्माण केला.
यावेळी आमदार बरेच भरत गोगावले यांनीही शेलक्या शब्दात खासदार तटकरे यांचा समाचार घेतला. सत्ता गेल्यानेच खा.तटकरे सध्या जॅकेट अन् आणखी काही शोधतात रायगडचे खा.तटकरे सध्या सत्ता गेल्याचे जिव्हारी लागल्यासारखे आपल्या जॅकेट आणि अन्य बाबींवर बोलत बसतात, असे आ. गोगावले यांनी त्यांचे बोलणे आता मनावर घ्यायचे काही कारण नाही, असे सांगत आ.दरेकर यांचे यावेळी आ.गोगावले यांनी कौतुक केले. आ.गोगावले यांनी आगामी काळात प्रवीणभाऊंसोबत आपण एकमताने विकासकामे करणार आहोत तसेच येत्या दि.१९ जानेवारीच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीतदेखील आपण दोघे सोबत असू, अशी ग्वाही दिली.
श्रीकाळकाई मंदिराच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त दिपोत्सव व भजन, भव्य कोतवाल नागरी सत्कारादरम्यान साई समर्थ प्रॉडक्शन निर्मित स्वाती महाडीक पुणेकर प्रस्तुत ‘महाराष्ट्राचे मानकरी लोकधारा’ हा मनोरंजनाचा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगतदार होत गेला. या सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान, महाडचे आ.भरत गोगावले, राजिपचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मण मोरे, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख निलेश अहिरे आणि अन्य कार्यकर्त्यांसोबत कोतवाल नगरीमध्ये आले होते. या कार्यक्रमानिमित्ताने हे सगळे नेते एकत्र आले होते.