कोंकण

जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत रोहा तालुक्यातील संघांचा दबदबा

,
पुरुष गटात पोफळघर प्रथम तर सानेगाव व्दितीय ,
महिला गटात धाविर स्पोर्ट्स रोहा प्रथम

रविंद्र कान्हेकर, रायगड
रायगड जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेमध्ये रोहा तालुक्यातील खेळाडूंनी विशेष चमक दाखवली
रायगड जिल्हयातील उरण तालुक्यातील बोकडविरा येथे ही स्पर्धा पार पडली.या स्पर्धेत पुरुष वरिष्ट गटात जे.बी.स्पोर्ट पोफळघर संघाने खो खो खेळातील आपला दबदबा कायम राखत विजेतेपदावर आपले नाव कोरले तर उपविजेतेपद सानेगाव संघाने पटकाविले महिला गटात धाविर स्पोर्ट कल्ब रोहा संघाने प्रथम क्रमांक मिळवित तालुक्याचे नाव या स्पर्धेत उज्ज्वल केले.


या स्पर्धेचे आयोजन द्रोणागिरी स्पोर्टस असोसिएशन यांच्यावतीने करण्यात आले होते. २ जानेवारी ते ६ जानेवारी या चार दिवसात उरण तालुक्यातील बोकडविरा-चारफाटा एन.एम.एस.ई.झेड मैदानावर खेळल्या गेलेल्या स्पर्धेमध्ये जिल्हयातून खो खो पुरुष वरिष्ठ गटात १६ तर महिला वरिष्ठ गटात १२ संघ सहभागी झाले होते.

रोहा तालुक्याप्रमाणेच जिल्हयात देखील खो खो स्पर्धेत कायम दबदबा राहिलेल्या जे.बी.स्पोर्ट पोफळघर संघाने सुरुवातीपासूनच आपल्या लैाकिकाला साजेसा खेळ करीत संपूर्ण स्पर्धेत आक्रमण व संरक्षण या दोन्ही पातळीवर नेत्रदिपक खेळ करीत उपस्थित क्रिडाप्रेमींच्या डोळयांचे पारणे फेडले.

वरिष्ठ खो-खो पुरुष गटात झालेल्या अंतिम सामन्यात जे.बी.स्पोर्ट पोफळघर संघाने सानेगाव संघावर १ डाव ६ गुणांनी मात करीत विजय मिळविला सानेगाव संघ उपविजेता ठरला तर महिला खो-खो वरिष्ठ गटात झालेल्या अंतिम सामन्यात धाविर स्पोर्ट रोहा या महिलांच्या खो-खो संघाने कामोठे पनवेल संघावर १ डाव १० गुणांनी दणदणीत मात करीत विजेतेपदावर आपले नाव कोरले. रोहा तालुक्यातील पुरुष व महिला खो खो संघानी जिल्हास्तरीय स्पर्धेत मिळविलेल्या यशाचे तालुक्यातून सर्व स्तरातून केैातूक होत आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Comment