पश्चिम महाराष्ट्र

9 वर्षाच्या बालकाचे अपहरण करून निर्घुण हत्या, आरोपीला जन्मठेप

कोल्हापूर – उसने घेतलेले पैसे परत मागितल्याच्या रागातून ९ वर्षाच्या बालकाचे अपहरण करून निर्घुणपणे खून केल्याप्रकरणी गगनबावडा तालुक्यातील तिसंगी इथल्या विश्वास उर्फ बंडा लोहार याला जिल्हा व सत्र न्यायाधीश एस एस तांबे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीन ऍडव्होकेट मंजुषा पाटील यांनी काम पाहिलं करवीर तालुक्यातील मरळी येथील सरदार सुतार यांचा मरळी फाटा येथे फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. व्यवसायिक ओळखीतून त्यांनी तिसंगी येथील विश्वास उर्फ बंडा लोहार याला चाळीस हजार रुपये हात उसने दिले होते. दरम्यान, हातउसणे घेतलेले पैसे परत मागितल्याच्या रागातून आरोपी विश्वास उर्फ बंडा लोहार यानं फिर्यादी सरदार सुतार यांच्या ९ वर्षीय प्रदीप सुतार या बालकाचं अपहरण करून खून केल्याची घटना नोव्हेंबर २०१७ मध्ये घडली होती. याप्रकरणी सरदार सुतार यांच्या फिर्यादीवरून आरोपी विश्वास उर्फ बंडा लोहार यांच्या विरोधात कळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

पोलिसांनी याप्रकरणी तपास करून आरोपी विश्वास उर्फ बंडा लोहार याच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं होत. या प्रकरणी ९ वर्षीय बालकाचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी तिसंगी येथील आरोपी विश्वास उर्फ बंडा लोहार याला जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस एस तांबे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

पाच वर्षांपूर्वी तिसंगी गावात घडलेल्या या घटनेने कोल्हापूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती पोलीस प्रशासना समोर देखील या प्रकरणाचा तपास करणे हे आव्हान बंद होतं मात्र पोलीस आणि कसोशीने तपास करत आरोपी पर्यंत पोहोचण्यात बाजी मारली पाच वर्षानंतर आरोपीला जन्मठेपेची शिक्षा झाल्याने दुर्दैवी प्रदीप सुतार या बालकाच्या कुटुंबाला दिलासा मिळाला आहे .

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment