पश्चिम महाराष्ट्र

लहान मुलाला खाऊ देत, थेट त्या मुलाचे अपहरण

पुणे – पुणे रेल्वे स्थानकावर एका अनोळखी व्यक्ती सोबत गप्पा मारणे एका जोडप्याला चांगलाच महागात पडलं आहे. गप्पा गोष्टी सांगून विश्वास प्राप्त करत लहान मुलाला खाऊ घेऊन देतो, असा सांगून मुलाच अपहरण केल्याची घटना पुणे रेल्वे स्टेशनवर १२ दिवसांपूर्वी घडली होती.

अपहरण झालेल्या मुलाला लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या जवाणाना शोध घेण्यात यश आलं असून, या प्रकरण एका महिलेसह दोघांना अटक करण्यात आली. विजय अनंत जयस्वाल आणि सुमन शर्मा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० डिसेंम्बरला रात्री १० वाजता पुणे रेल्वे स्थानक परिसरातून अडीच वर्षांचे बालक भूपेश भुवन पटेल यांचे अपहरण झाले होते. उदरनिर्वाहासाठी पुण्यात आलेलं पटले दाम्पत्य आपल्या मूळ गावी झारखंडला निघाले होते. पुणे रेल्वे स्थानक परिसरात आरोपी जयस्वाल आणि शर्मा यांची पटेल दाम्पत्याशी भेट झाली. त्यांच्या सोबत ओळख करून गप्पा मारता त्यांच्याशी ओळख वाढविली. त्यानंतर बाळाला खाऊ आणतो, अशी बतवणी करत शर्मा आणि जयस्वाल भूपेशला बरोबर घेऊन गेले आणि भुपेशच अपहरण केलं.

पटेल दाम्पत्याने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले. शहरातील हाॅटेल आणि लाॅजची तपासणी करण्यात आली. पोलिसांनी शहर तसेच परिसरातील २५० ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले. तपासात मिळालेल्या माहितीनुसार रांजणगावर परिसरातून अपहरण करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून अडीच वर्षांच्या बालकाची सुखरुप सुटका करण्यात आली.

लोहमार्ग पोलीस दलाच्या पोलीस महासंचालक डॉ. प्रज्ञा सरवदे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश शिंदे, उपअधीक्षक चंद्रकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद खोपीकर, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख आणि पथकाने ही कारवाई केली.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment