ठाणे – मुंब्रा येथे आई आपल्या अल्पवयीन मुलीला प्रेमप्रकरणावरून वर्णावर टोकात असल्याच्या रागातून मुलीने आपल्या प्रियकराच्या मदतीने धारदार शास्त्राच्या मदतीने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हत्येनंतर मुलगी आणि तिचा प्रियकर हे दोघेही फरार आहेत. मुंब्रा पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून घेतला असून फरार आरोपींचा शोध घेत आहेत.
ठाण्यातील मुंब्रा परिसरातील आंबेडकर नगर येथील फातिमा हाईट्स या इमारतीत राहणाऱ्या एका तरुणीने आपल्या प्रियकराच्या मदतीने आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आपल्या १७ वर्षीय मुलीचे एका तरुणासमोर प्रेम प्रकार असल्याचे समजून आले. त्यानंतर आपल्या मुलीच्या भविष्याचा विचार करून आईने प्रियकरासोबत असलेल्या नात्यावरून आई वारंवार टोकण्यास सुरुवात केली आणि त्याच रागातून हि हत्या केली अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. सबा मेहंदी हाश्मी असे या हत्या झालेल्या आईचे नाव असून सना असे हत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. सध्या हत्या करणारी तरुणी आणि तिचा प्रियकर हे दोघेही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
सबा यांच्या जवळच्या एका नातेवाईकांनी साबा यांना फोन केला असता त्यांचा फोन बंद होता. त्यानंतर त्या नातेवाईकाने सना ला फोन केला मात्र सनाकडून हि कुठला प्रतिसाद न मिळाल्याने नातेवाईकाला संशय आला आणि त्यांनी सबा यांच्या राहत्या घरी धाव घेतली. घराला बाहेरून कुलूप होते आणि घराच्या आतून फोन चा आवाज येत असल्याने नातेवाईकांचा संशय बळावला आणि त्यांनी घराचे कुलूप तोडून घरात गेले. त्यावेळी सबा या रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत जमिनीवर पडल्या होत्या त्यानंतर या हत्येचा उलघडा झाला. यावेळी सबा यांच्या मानेवर, गळ्यावर, छातीवर धारदार सुरीने वार करून तिला जीवे ठार मारल्याचे आढळून आले.
या घटनेची माहिती मिळताच मुंब्रा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करत ३०४/३४ प्रमाणे हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या या आईची हत्या करणाऱ्या त्या अल्पवयीन मुलीचा आणि तिच्या प्रियकराचा शोध पोलीस सुरु असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांनी दिली आहे.