चंद्रपूर – ५५ कोटी वृक्षारोपणाची संकल्पना राबवणाऱ्या वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या जिल्ह्यात ५५ झाडांची कत्तल केल्या गेली. ही वृक्ष प्रस्तावित जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन प्रशासकीय इमारत बांधकामात अडथळा ठरली होती. तसं वृक्ष तोडण्याची रीतसर परवानगी मनपान घेतली होती. तोंडन्यात येणाऱ्या ५५ वृक्षांच्या मोबदल्यात २७५ वृक्षांचे रोपण केल्या जाईल अस सांगितल्या जात आहे. जिल्हात कोटी वृक्षांची लागवड केल्या गेली. आजच्या घडीला किती वृक्ष जिवंत आहेत हा शोधाचा विषय आहे. या वृक्षतोडीवर पर्यावरण प्रेमी संताप व्यक्त करीत आहे.

जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन प्रशासकीय इमारत प्रस्तावित आहे. इमारतीच्या बांधकामास ५१. ६९ कोटीची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. इमारत बांधकामाच्या वास्तु मांडणी आराखड्यामध्ये ५५ झाडे अडसर ठरलीत. झाडे तोडण्याची रीतसर परवानगी मनपाने दिली. सद्यस्थितीत खोदाई कामात येणारी ३० झाडे तोडण्यात आली आहेत. उर्वरित २५ झाडे पुन्हा तोडण्यात येणार आहेत. तोडण्यात आलेल्या ५५ झाडाऐवजी नवीन २७५ झाडे परिसरात लावण्यात येणार आहेत.

त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, याची आवश्यक खबरदारी घेण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे. ५५ कोटी वृक्ष लागवड अभियानात गावात मोठ्या प्रमाणे वृक्षारोपण केल्या गेले. समाजमाध्यमात वृक्षारोपण करतानाचा फोटोंचा ढीग जमा झाला होता. लावलेल्या वृक्षांपैकी किती वृक्ष जगले हे शोधूनही सापडणार नाही. असे असताना विकासाच्या नावावर मात्र वृक्षांची तोड केल्या जात आहे.