विदर्भ

धक्कादायक प्रकार, खेळण्याच्या वयात मातृत्व

अमरावती – जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील एका गावात शाळकरी मुलीला प्रेमसंबंधातून गर्भधारणा झाल्यानंतर अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरनात पोलिसांनी २२ वर्षीय युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ग्रामीण पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितनुसार, गोंडस मुलाला जन्म देणाऱ्या मुलीचे वय १६ वर्षे आहे. १३ डिसेंबर रोजी तिने बाळाला जन्म दिला. तीच्यावर अल्प वयात मातृत्व लादणारा आरोपी युवक हा नेर परसोपंत (जि. यवतमाळ) तालुक्यातील मालेगाव झुमाजी गावातील रहिवासी आहे.

कृष्णा ज्ञानू राठोड असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, पीडित १६ वर्षीय करण्यात मुलगी व आरोपी कृष्णा यांच्यात दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्यानें तिला लग्नाचे आमिष दिले. पुढे शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तो लग्न करेल, या आशेपोटी तिने लैंगिक शोषणाची बाब कुटुंबीयांपासून दडवून ठेवली. मात्र, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात तिचे पोट दुखू लागल्याने तिला शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, ती अल्पवयीन असल्याचे लक्षात आले. त्यामुळे तेथील डॉक्टरांनी त्याबाबत नेर परसोपंत पोलिसांना माहिती दिली. मात्र, घटनास्थळ चांदूर रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने तो गुन्हा तपासासाठी स्थानिक पोलिसांकडे वर्ग आला. आरोपीविरुद्ध अपहरण, बलात्कार, पॉक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment