विदर्भ

नेलकटर मधील चाकुने मित्रानेच कापला मित्राचा गळा

अमरावती – जिल्ह्यात सध्या गुन्हेगारींमध्ये अल्पवयीनांचा आकडा वाढत चालला आहे. अशातच अमरावती ते बडनेरा जुन्या बायपास मार्गावर एका वीस वर्षीय तरुणाने परिचित असलेल्या मित्राचा नेलकटरमधील चाकूने गळा कापला आहे. हा वाद मैत्रिणीसाठी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजय ऊर्फ रुद्रेश शैलेश दीक्षित (२०, रा. एमआयडीसी परिसर, अमरावती) असे जखमीचे नावं असुन हर्ष शर्मा असे चाकू मारणाऱ्या आरोपी तरुणाचे आहे. रुदेश आणि हर्ष हे एकमेकांच्या परिचित आहेत.

रुद्र अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाला शिकत असून हर्ष हा बियाणी महाविद्यालयात पदवीच्या अंतिम वर्षाला आहे. ज्या वरुन वाद निर्माण झाला ती तरूणी एका महाविद्यालयात बीएससी करत आहे. दरम्यान, तरुणी आणि हर्ष एकमेकांचे चांगले मित्र आहेत. मात्र, मागील काही दिवसांपासून रुद्रेशसुद्धा तरुणीने आपल्याशी मैत्री करावी, यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यामुळे अनेकदा तो तरुणीचा पाठलाग करत असल्याचे पोलिसांनी दिली.

दरम्यान, ही बाब तरुणीने हर्षला सांगितली. दरम्यान रुद्रेश तरुणीच्या घराकडे गेला असता त्याच भागात हर्षसुद्धा गेला होता. या दोघांची भेट झाली व त्याच कारणावरुन दोघांमध्ये चर्चा सुरू झाली. चर्चेचे रूपांतर वादात झाले. त्यानंतर हर्षने जवळच्या नेलकटरमधील चाकू काढला आणि थेट रुद्रेशच्या गळ्यावर वार केला. हा चाकू फार धारदार नसला तरीही गळा कापल्या गेला. त्यामुळे रुद्रेशचा गळा चिरल्या गेला. घटनेच्या वेळी त्या ठिकाणाहून जाणाऱ्या दोन वाहतूक पोलिसांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तत्काळ धाव घेऊन हर्षला ताब्यात घेतले व रुद्रेशला रुग्णालयात पाठवले. या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी हर्ष शर्माविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment