पश्चिम महाराष्ट्र

कोलापूरचे चित्रकार नागेश हंकारे यांच्या चित्राला नॅशनल अवॉर्ड

कोल्हापूर – ऑल इंडिया फाईन आर्टस अँड क्राफ्टस सोसायटी (आयफेक्स) न्यू दिल्ली मार्फत आयोजित केलेल्या 95 व्या वार्षिक कला प्रदर्शनासाठी एकूण 731 कलाकृती मधून चित्रकार नागेश हंकारे यांच्या “ब्युटी ऑफ नेचर” या चित्राची निवड झाली असून या चित्रास “मनोहर कौल मेमोरियल कॅश अवॉर्डनी” सन्मानीत करण्यात आले.

अवॉर्ड सोहळा ऑल इंडिया फाईन आर्ट्स & क्राफ्ट्स सोसायटी (आयफेक्स) न्यू दिल्ली येथे प्रतिष्टीत मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. अवॉर्ड वितरण जगप्रसिद्ध चित्रकार प्रेम सिंग यांच्या हस्ते व जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला. समारंभास चेअरमन प्रो. बिमल दास, विजय सूद यांच्यासह कलाक्षेत्रातील अनेक मान्यवर व कलारसिक उपस्थित होते.

निवडक कलाकृतींचे प्रदर्शन 6 डिसेंबर ते 21 डिसेंबर 2022 पर्यंत सकाळी 11 ते 7 या वेळेत ऑल इंडिया फाईन आर्टस अँड क्राफ्टस सोसायटी (आयफेक्स) न्यू दिल्ली येथे विनामूल्य खुले आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment