कोल्हापूर – २० डिसेंबर २०२२ रोजी जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई येथे शिल्पकार अनुप संकपाळ, चित्रकार जावेद मुल्ला, चित्रकार अमोल सावंत यांचे चित्र-शिल्प समूह प्रदर्शनाचे उदघाटन झाले.

या प्रदर्शनाचे उदघाटन कलासंचनालयाचे कलासंचालक मा. विश्वनाथ साबळे, प्रख्यात चित्रकार व शिल्पकार संजीव संकपाळ तसेच जहांगीर आर्ट गॅलरी च्या सेक्रेटरी के.जी.मेनन, ऍडव्होकेट दत्ता पवार तसेच माजी सिआईडी ऑफिसर बाळू मकतूम यांच्या हस्ते पार पडले.

या प्रदर्शनास पहिल्या दिवशीच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हे प्रदर्शन २६ डिसेंबर २०२२ पर्यंत सर्वांसाठी खुले राहील.