पश्चिम महाराष्ट्र

बायोगॅस प्रकल्प राबविण्यात कोल्हापूर जिल्हा आघाडीवर

कोल्हापूर – शासनाने अनुदान बंद केल्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेली बायोगॅस योजना यावर्षी पुन्हा सुरू करण्यात आली आहे. राज्यात पाच हजार बायोगॅसचे उद्दिष्ट असून जिल्ह्याकरिता १ हजार १५ बायोगॅसचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. गोकुळ’च्या वतीनेही बायोगॅस प्रकल्प राबविण्यात येत असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत ५,३८९ दूध उत्पादक शेतकर्‍यांनी यासाठी नावनोंदणी केल्याचे ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी सांगितले.

शासनाने आता बायोगॅस प्रकल्पाला अनुदान देण्यास सुरुवात केल्यामुळे जिल्हा परिषदेच्या वतीनेही ही योजना राबविण्यात येणार आहे. यावर्षी सर्वसाधारण गटातून १ हजार व अनुसूचित जाती-जमाती गटातून १५ बायोगॅस प्रकल्प उभारण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी सर्वसाधारण गटाकरिता १४,३५० रुपये तर अनुसूचित जाती- जमातीसाठी २२ हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. सयंत्र शौचालयास जोडल्यास अतिरिक्त १,६०० रुपये लाभार्थ्यास देण्यात येणार आहे. बायोगॅस प्रकल्प योजना राबविण्यात जिल्हा सतत आघाडीवर राहिला आहे. योजनेसाठी लाभार्थ्यांकडून प्रस्ताव मागविण्यात येत असल्याचे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी भीमाशंकर पाटील यांनी सांगितले.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment