पश्चिम महाराष्ट्र

इंडिगो एअरलाईन्स तर्फे कोल्हापूर हून कनेक्टींग फ्लाईटद्वारे

कोल्हापूर – इंडिगो एअरलाईन्स तर्फे कोल्हापूर विमानतळावरून देशातील प्रमुख शहरांना जोडणारी विमानसेवा सुरू होणार आहे. त्यामुळे कोल्हापूर विमानतळावर येणार्‍या प्रवाशांना मोठी सुविधा मिळणार आहे. कोल्हापूर- अहमदाबाद, कोल्हापूर – हैद्राबाद, कोल्हापूर – बेंगलुरू आणि कोल्हापूर- तिरूपती या चार मार्गावर थेट विमानसेवा इंडिगो एअरलाईन्स तर्फे दिली जात आहे. १३ जानेवारीपासून कोल्हापूर ते बेंगलुरू आणि पुढे कोईमतुर ही विमान सेवा सुरू होत आहे. त्याशिवाय कोल्हापूर पासून देशातील काही प्रमुख देशांसाठी कनेक्टींग फ्लाईट उपलब्ध आहेत. त्यानुसार भुवनेश्‍वर, चंदीगड, चेन्नई, कोईमतुर, दिल्ली, गुवाहाटी, इंदोर, जयपूर, कोची, कोलकत्ता, लखनौ, मंगलूरू, मुंबई, तिरूअंनतपुरम, त्रिचीरापल्ली आणि विशाखापट्टणम या शहरांसाठी, इंडिगो एअरलाईन्सच्या कनेक्टींग फ्लाईटस् प्रवाशांना उपलब्ध आहेत.

विशेष म्हणजे कोल्हापूर विमानतळावर चेक इन केल्यानंतर, त्यांना प्रवासाच्या अंतिम ठिकाणापर्यंतचा बोर्डींग पास मिळेल आणि प्रवाशांचे बॅगेजही परस्पर दुसर्‍या विमानात चढवले जाईल. अंतिम गंतव्य स्थानावर प्रवाशांना त्यांचे बॅगेज आणि लगेज मिळेल. त्यामुळे कोल्हापूर विमानतळावरून प्रवास करणार्‍यांची हवाई सफर अधिक सुखकर आणि सुलभ होणार आहे. कोल्हापुरातून देशातील २० प्रमुख शहरांमध्ये इंडिगो एअरलाईन्सनं थेट किंवा अन्य शहरांमार्गे आणि कनेक्टींग फ्लाईटद्वारे प्रवासी सेवा उपलब्ध केली आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि मानसिक त्रास कमी होणार आहे. आणि ही मोठी पर्वणीच उघोग विश्वा साठी ठरणार आहे .

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment