कोल्हापूर – जिल्ह्यातील ४२९ ग्रामपंचायतींपैकी १९ गामपंचायतींचे निकाल हाती आले असून १२ ग्रामपंचायतींमध्ये भाजप शिंदे गटाने झेंडा फडकवला आहे. शिरोळ तालुक्यात शिंदे गटाने सर्वाधिक चार ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. राधानगरी तालुक्यातही शिंदे गटाने खाते उघडलं आहे. हसणे गावच्या पुजा शरद पाटील सरपंचपदी विजयी झाल्या आहेत. आजरा तालुक्यातील सरबळवाडी राष्ट्रवादीने झेंडा फडकवला आहे. सरपंच उमेदवार सुनिता कांबळे विजयी झाल्या आहेत.
शाहूवाडी : तहसील कार्यालयातील जुने शासकीय धान्य गोदाम
पन्हाळा : नगरपालिका सभागृह
करवीर : बहुउद्देशीय हॉल रमण मळा कसबा बावडा
कागल : जवाहर नवोदय विद्यालय
गडहिंग्लज : नगरपरिषद पॅव्हिलियन हॉल
चंदगड : तहसील कार्यालय मध्यवर्ती प्रशासकीय इमारत
शहराच्या वेशीवरील गावांमधील निकालाची उत्सुकता
कोल्हापूर शहराच्या वेशीवरील गावांमध्ये निवडणूक होत असल्याने उत्सुकता आहे. वडणगे, पाचगाव, उचगाव, कळंबा, मोरेवाडी या ग्रामपंचायतींमध्ये थेट महाडिक (Dhananjay Mahadik) आणि सतेज पाटील (Satej Patil) गटात स्पर्धा असल्याने कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे. पाचगावमध्ये ६६ टक्के मतदान झाले. पाचगावमध्ये महाडिक आणि पाटील गटात थेट स्पर्धा आहे. अपक्षांनी सुद्धा मोठी ताकद लावली असल्याने डोकेदुखी कोणाला होणार हे निकालानंतर समजेल. (Kolhapur District Gram Panchayat Election)
पाचगाव, कंदलगाव व मोरेवाडी ग्रामपंचायतीमध्ये थेट दोन गटांमध्ये सामना होत असून अपक्षही रिंगणात आहेत. पाचगावमध्ये सरपंचपद सर्वसाधारण महिला वर्गासाठी आरक्षित आहे. सरपंचपदासाठी चार उमेदवार रिंगणात आहेत. पाचगावमध्ये एकूण वॉर्ड ६ असून १७ सदस्यांसाठी निवडणूक होत आहे. सरपंचपदासाठी प्रियांका संग्राम पाटील, सुवर्णा भिकाजी गाडगीळ, भारती संतोष ओतारी, मिनाक्षी महेश डोंगरसाने रिंगणात आहेत. या ठिकाणी महाडिक, पाटील गटात चुरस आहे. कंदलगावमध्येही याच दोन गटात सामना आहे. मोरेवाडीतही पाटील व महाडिक गटात चुरस आहे.