पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापुरात जागा २४ तर अर्ज पावणेचार लाख

कोल्हापूर – राज्यात होत असलेल्या पोलिस भरतीचा आज अखेरचा दिवस आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील केवळ २४ जागांसाठी तब्बल पावणेचार हजारांवर अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान आज पोलीस भरतीसाठी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. अर्ज दाखल करण्यासाठी आज अखेरचा दिवस असल्याने यामध्ये आज आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चार हजारांहून अधिक उमेदवार भरतीसाठी असण्याचा अंदाज आहे. 

दरम्यान, पोलिस भरतीसाठी आतापर्यंत ११ लाख अर्ज आल्याची माहिती समोर आली आहे. एका जागेसाठी तब्बल ८० उमेदवारांमध्ये स्पर्धा असेल. दरम्यान, सध्या होत असलेल्या पोलिस भरतीत तृतीयपंथीयांना संधी मिळणार आहे. तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र पर्याय ठेवण्यास तयारी असल्याची माहिती राज्य सरकारने हायकोर्टात दिली आहे. पोलीस भरतीमध्ये उच्च न्यायालयाने तृतीयपंथींसाठी पर्याय उपलब्ध करुन देण्याबाबत ९ डिसेंबर रोजी आदेश दिले होते. त्यामुळे तृतीयपंथीयांनाही अर्ज करण्यासाठी १३ डिसेंबरपर्यंत वेबसाईटवर ‘तृतीयपंथीय’ हा तिसरा पर्याय उपलब्ध केला जाईल, अशी ग्वाही राज्य सरकाचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात दिली होती. त्यानुसार गृह विभागाने पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. 

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment