पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूरात रंगणार सुरांची मैफल

कोल्हापूर – येथील रंगबहार संस्थेच्या वतीने २२ जानेवारीला ‘मैफल रंग-सुरांची‘ हा उपक्रम रंगणार आहे. टाऊन हॉल बागेत होणाऱ्या या उपक्रमात (कै) श्यामकांत जाधव रंगबहार जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ चित्रकार जी. एस. माजगावकर यांना दिला जाणार आहे. ‘नाबार्ड’चे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात, जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे अधिष्ठाता विश्वनाथ साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होणार आहे.

मैफलीत शिवराज पाटील, डॉ. पूजा पाटील-गोटखिंडीकर यांचे गायन होणार असून त्यांना नरेंद्र पाटील, कैवल्य पाटील यांची साथसंगत असेल. चित्रकार गिरीश आदन्नावर (निपाणी), मीनाक्षी सदलगी (बेळगाव), भारतभूषण होगाडे, दिलीप दुधाणे, केदार पवार (इचलकरंजी), शुभम गावडे (कोल्हापूर), शिल्पकार अमोल हरेकर (मुंबई), रोहन तळवडेकर (सिंधुदुर्ग) यांचा कलाविष्कार असेल. दरम्यान, मैफलीच्या निमित्ताने श्री. माजगावकर यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन राजर्षी शाहू स्मारक भवनात होणार असून २१ ते २३ जानेवारीदरम्यान रसिकांना या प्रदर्शनाचा लाभ घेता येणार आहे. मैफलीचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख मार्गदर्शक व्ही. बी. पाटील, अध्यक्ष धनंजय जाधव, सचिव संजीव संकपाळ यांनी केले आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment