पश्चिम महाराष्ट्र

प्रसिद्ध अभिनेता व मॉडेल मिलिंद सोमण यांचा कोल्हापुरात जंगी स्वागत

कोल्हापूर – पर्यावरण संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतो त्याच पद्धतीने निसर्गाला जपा, पर्यावरण वाचवा. पर्यावरण निरोगी आणि प्रदूषण मुक्त राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी नव्हे तर कर्तव्यच आहे “अशी साद प्रसिद्ध अभिनेता व मॉडेल मिलिंद सोमण यांनी कोल्हापूरकरांना घातली. उत्तम फिटनेस आणि निसर्ग संवर्धन यासंबंधी प्रचंड जागरूक असणारा कलाकार.मॉडेलिंग क्षेत्रातील हा सुपर आयकॉन. कोल्हापुरातल्या भेटीत त्याची पर्यावरण वाचण्यासंबंधीची तळमळ दिसून आली.

निमित्त होते, “ग्रीन राईड ट्वेंटी. एक पहल स्वच्छ हवा की ओर” या पर्यावरण पूरक उपक्रमाचे निरोगी स्वास्थ्य जीवनासाठी प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा या अनुषंगाने प्रबोधन करण्यासाठी मिलिंद सोमण हे सायकलवरून देशभर दौरा करत आहेत. मुंबई, पुणे कोल्हापूर, बेळगाव, बेंगलोर, मेंगलोर अशी सायकल स्वारी आहे. बँक ऑफ बडोदाच्या सहकार्याने हा उपक्रम सुरू आहे. बुधवारी २१ डिसेंबर रोजी सोमण हे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यांचे बँक ऑफ बडोदाच्या वतीने स्वागत करण्यात आले. यानंतर जेम्स स्टोन येतील बँक ऑफ बडोदा च्या कार्यालयात बॉब वल्ड या मोबाईल बँकिंग एप्लीकेशनचा प्रसारही करण्यात आला. याप्रसंगी अभिनेता मिलिंद सोमण यांच्या हस्ते ग्राहकांना रोपांची वाटप करत पर्यावरण वाचवा संदेश देण्यात आला.

बँक ऑफ बडोदाचे क्षेत्रीय प्रमुख प्रशांत आव्हाड, उपक्षेत्रीय प्रमुख देविदास पालवे यांच्या हस्ते अभिनेता मिलिंद सोमण यांचा कोल्हापुरी फेटा बांधून सत्कार करण्यात आला. करवीर निवासिनी अंबाबाईची मूर्ती प्रदान केली. याप्रसंगी क्षेत्रीय विकास व्यवसाय प्रबंधक मोहसीन शेख, सहाय्यक प्रबंधक सचिन देशमुख, जी विजयालक्ष्मी यांच्यासह अधिकारी वर्ग उपस्थित होता.

प्रसारमाध्यमाशी बोलताना अभिनेता मिलिंद सोमण यांनी पर्यावरण जागृती विषयी लोकांना आवाहन केले. “प्रत्येक जण आपल्या आरोग्याची काळजी घेत असतो. त्याच पद्धतीने आता निसर्गाची काळजी घेण्याची गरज आहे पर्यावरण संवर्धन हे प्रत्येकाची जबाबदारी आहे. प्रत्येक गोष्टीसाठी सरकारवर अवलंबून राहण्यापेक्षा आपण आपल्या परीने चांगल्या गोष्टीसाठी योगदान दिले पाहिजे. पर्यावरण संवर्धन व निसर्ग वाचविणे यासंबंधी समाजात जागृती आहे म्हणून २०१२ मध्ये मी दिल्ली ते मुंबई असा धावलो होतो. आता देशातील विविध राज्यांमध्ये सायकलवरून दौरा करत आहे.”

 “प्रत्येकाने आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. रोज थोडा वेळ तरी निरोगी स्वास्थ्यासाठी द्यावा.”असे आवाहन त्यांनी केले. उत्तम फिटनेसबद्द्ल बोलताना ५६ वर्षीय मिलिंद सोमण म्हणाले, “मी रोज थोडा वेळ माझ्या आरोग्यासाठी देतो. नियमित जीमला जात नाही. सायकलिंग करत नाही. मात्र मी आरोग्याविषयी प्रचंड जागरूक आहे. रोज थोडा वेळ तरी व्यायाम करतो. जमेल तेव्हा व्यायाम करतो. प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी करावी. सोबत निसर्ग व पर्यावरणही जपावा. निसर्गाला हानिकारक ठरतील अशा गरजा टाळा. कमीत कमी गरजा असाव्यात. आपण ज्या गरजा वाढविल्या आहेत त्या खरोखर गरजेचे आहेत का ?याचाही एकदा विचार करावा. पर्यावरण निरोगी आणि प्रदूषण मुक्त राहील ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.”

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment