पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापुरात पाणी टंचाई हे आहे कारण

कोल्हापूर – निम्म्यापेक्षा जास्त कोल्हापूर शहराला पुईखडी फिल्टर हाऊसमधून पाणीपुरवठा होतो. परंतु, या फिल्टर हाऊसकडे पाणीपुरवठा करणार्‍या नवीन आपटेनगर पंपिंग स्टेशनमधील मोटार जळाली. त्यामुळे निम्म्या कोल्हापूर मध्ये आज पाण्याचा ठणठणात झाला आहे . यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. शहरात दत्त जयंती निमित्त विविध उत्सव असल्याने देखील पाणीटंचाईचा फटका बसत आहे .

शिंगणापूर उपसा केंद्रातून नवीन आपटेनगर पंपिंग स्टेशनमध्ये पाणी सोडण्यात येते. या पंपिंग स्टेशनमधील पाणी पुईखडी फिल्टर हाऊसला जाते. या ठिकाणी पाण्यावर शुद्धीकरण प्रक्रिया होऊन ते शहराच्या विविध भागांत वितरित करण्यात येते. यात ई वॉर्डातील बहुतांश भाग आणि ए, बी, सी वॉर्ड आदींचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात पाण्याची समस्या जाणवत आहे. रोज कुठे तरी पाण्यासाठी रास्ता रोको आंदोलन होत आहे. तरीही त्याचे गांभीर्य महापालिका प्रशासनाला नसल्याचे दिसत आहे. परिणामी, नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

नवीन आपटेनगर पंपिंग स्टेशनमध्ये 170 हॉर्सपॉवरच्या चार मोटारी आहेत. त्यापैकी पंधरा दिवसांपूर्वी एक मोटार जळाली. त्याच्या ठिकाणी स्टँडबाय असलेली मोटार बसविण्यात आली. त्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत सुरू झाला. परंतु, बिघाड झालेली मोटार 15 दिवस उलटले तरीही दुरुस्त करून आणलेली नाही. परिणामी, स्टँडबाय मोटार नाही. त्यामुळे तीन पंपांवर पाणीपुरवठा सुरू आहे. प्रशासनातील अधिकार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे शहवासीयांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment