पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापुरातील कणेरीच्या सिद्धगिरी मठावर अवतरणार पंचमहाभूतांचे विश्व

कोल्हापूर – कणेरी  सिद्धगिरी मठ कणेरी येथे येत्या २० ते २६ फेब्रुवारी दरम्यान होत असलेला ‘सुमंगल पंचमहाभूत लोकोत्सव ‘आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला असून त्यामुळे कोल्हापूरसह महाराष्ट्र राज्याची एक वेगळी विधायक आणि व्यापक ओळख निर्माण होईल असा विश्वास परमपूज्य अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी व्यक्त केला. या लोकोत्सवाच्या मध्यवर्ती संकल्पनेनुसार ‘आकाश – वायू – अग्नी जल आणि पृथ्वी या पंचमहाभूतांच्या प्रांरभापासून आजच्यापर्यंतची प्रवास रचना मानवाच्या अतिरेकी वापरामुळे झालेली दुरावस्था आणि आगामी काळातील धोके व घेण्याची दक्षता या संदर्भाने प्रबोधन पर असे हे  पाच ड्रोम   हे सर्वांचे लक्षणीय अशी आणि ज्ञानात भर घालणारे असे ठरणार आहेत. 

सिद्धगिरी कणेरी मठावर सुरु असणाऱ्या अनोखे गुरुकुल विद्यालयामध्ये चार वेद,सहा शास्त्र आणि ६४ प्रकारच्या कला शिकविल्या जातात . ब्रिटिश प्रभावी मेकॉले शिक्षणपध्दतीने परस्पर संवाद नाहीसा झाला आहे कुटुंबव्यवस्था व सामाजिक जीवन उद्धवस्त होत आहे आणि केवळ चाकरमाने निर्माण झाले.शंभरातील केवळ तीन ते पाच जणांनाच नोक-या मिळतात. त्यावर हा एक कृतीशील प्रभावी प्रयार्य आहे . गोपालक,एक हजार वर्ष टिकणारे घर बनवणारा इंजिनिअर,प्रक्रिया उद्योजक,व्यायसायिक,शिल्पकार,ज्वेलर,संगीतकार, पाकशास्त्र, ज्योतीषशास्त्र (खगोलशास्त्र),हवामानशास्त्र,हॉर्स व बुल रायडींग,इतिहास, पाठांतर (आयुर्वेदाचे श्लोक),शिल्पवेद,धनुर्वेद,गंधर्ववेद ,युध्दकला,मॅनेजमेंट,नॅचरल सायन्स, वेदगणित, ब्युटीपार्लर अशा असंख्य ‘स्कुल मध्ये पारंगत होणार आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment