कोल्हापूर – रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्यावतीने बेंगलोर (कर्नाटक)येथे दिनांक १४ ते २४डिसेंबर २०२२ या कालावधीत होणाऱ्या ६०व्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्केटिंग स्पर्धेसाठी स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने मुंबई( विरार) येथे नुकत्याच राज्य अजिंक्यपद स्पर्धा घेण्यात आली होती. त्या स्पर्धेसाठी मान्यता प्राप्त ॲमेच्अर कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रोलर स्केटिंग असोसिएशनच्या वतीने जिल्हा संघ पाठवण्यात आला होता. यामध्ये कोल्हापूरच्या सात खेळाडूंनी आपापल्या गटात चांगली कामगिरी केली. या सुवर्ण कामगिरीमुळे या सात जणांची वेगवेगळ्या गटामध्ये महाराष्ट्र राज्याच्या स्केटिंग संघामध्ये निवड करण्यात आली आहे. हे सर्वजण नुकतेच बेंगलोर या ठिकाणी रवाना झाले आहेत .महाराष्ट्र राज्य संघात निवड झालेल्या खेळाडूंची नावे खालील प्रमाणे १)पृथ्वीराज पिराई( ५ते ७ वयोगट )२)स्वरा काळे (९ ते ११वयोगट )३)निहिरा यादव (११ते १४वयोगट)४) सिद्धवी माने( १४ते १७वयोगट) ५)तेजस्विनी कदम६) धनश्री कदम( खुला गट रोलर डर्बी).७) ओम जगताप (खुलागट स्पेशल विभाग )या सर्वांना जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष अनिल कदम अँड.धनंजय पठाडे प्रा. संभाजी पाटील. आकाराम पाटील (सर)प्रा.अजित मोहिते आंतरराष्ट्रीय स्केटिंग प्रशिक्षक डॉ. महेश कदम. राष्ट्रीय कोच भास्कर कदम. यांचे मार्गदर्शन लाभले.