नवी दिल्ली – विज्ञानाने बरीचशी प्रगती केली असून दिवसेंदिवस नवनवीन कल्पना पुढे येत आहे, आणि निश्चितच या कल्पना मानवी जीवन सुखकर करणे करिता विज्ञानाचा वापर केला जातो. इलेक्ट्रॉनिक माध्यमा मध्ये तर असंख्य कामे एकाच वेळी केली जातात,आणि ती सर्वांच्या सोईचे सुद्धा होते. परंतु इलेक्ट्रॉनिक् माध्यम जेवढे सोईचे तेवढेच त्यामध्ये अफरातफरी पण होण्याची शक्यता असते. सोयीस्कर वापरली तर सर्वच्या फायद्याची, याचा विचार केंद्रीय नवडणूक आयोग देशातील निवडणुकीतील मतदारांचे प्रमाण वाढवण्यासाठी दूरस्थ इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर करून , एकाच वेळी ७२ मतदार संघ एकमेकांसोबत जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे, यामुळे देशातील नागरिक कोणत्याही भागात वास्तव्यास असला तरी त्याला त्याठिकाणावरून मतदान करून आपला अधिकार बजावता येईल, देशात मोठ्या प्रमाणात एका भागातून दुसऱ्या भागात नागरिक कामानिमित्त आणि व्यवसाया निमित्त एका राज्यातून दुसऱ्या राज्यात रोजगारा करीत जात असतो. स्थलांतरित नागरिक याना मतदानाचा हक्क बजावता यावा करिता मतदार नोंदणीकृत मतदार संघातून जोडणी केलेल्या यंत्रावर त्याचे मत स्वीकारले जाईल. अशी संकल्पना राबविण्याच्या विचारधीन असून यावर लवकरच तांत्रिक आणि विश्वसनीयता तपासून सर्व बारकावे लक्षात घेऊन आणि त्रुटी पूर्ण करूनच सर्व राजकीय पक्ष यांचेपुढे मांडणी केली जाईल .