विदर्भ

कुरुम – वडगाव शिवारात अवैध उत्खनन कंपनीवर कारवाई कधी ?

मूर्तिजापूर – तालुक्यातील वडगाव – कुरुम परिसरात अवैधरित्या खनिज उत्खनन सुरू असून शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडविल्या जात आहे . त्याबाबत कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (ए) चे अकोला जिल्हासंपर्क प्रमुख व ठाणे जिल्हा महासचिव सचिन धनराज कोकणे यांनी १८ नोव्हेंबर रोजी तहसीलदार प्रदीप पवार यांना दिलेल्या निवेदनातून केली होती. मात्र याबाबत संबंधीत यंत्रणेकडून कोणत्याही प्रकारची माहिती पुरविण्यात न आल्याने सचिन कोकणे व सहकारी यांनी १६ डिसेंबर रोजी अवैध उत्खनन सुरू असलेल्या ठिकाणी जावून पाहणी केली असता त्यांना जेसीबी मशीनद्वारे जमिनीतून मुरूम काढून टिप्परमध्ये भरून वाहतूक करताना दिसून आले. विशेष म्हणजे उत्खनन करताना मोठमोठ्या झाडांची कत्तल होत असल्याचे निदर्शनास आले. सचिन कोकणे यांनी महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरुन बोलणी केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली असल्याचा आरोप त्यांच्या कडून करण्यात आला आहे.

सदर प्रकरणी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे व प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अवैद्य खनिज उत्खननाचे प्रकरण हे राज्याच्या महसूल मंत्र्यांच्या दरबारात लावून धरण्यात येणार असल्याचे सचिन कोकणे यांनी असे सांगितले आहे, वडगांव – कुरूम परिसरात ई-क्लास वर्ग-२ भुदान जमिनीतून माऊली कंन्स्ट्रक्शन ही कंपनी अवैधरित्या खनिज उत्खनन करीत आहे. प्रत्यक्षात त्यांनी आपले स्तरावरून उत्खननाची परवानगी घेतली का? घेतली असल्यास किती ब्रास? व कालावधी निश्चित केला असेल. त्याशिवाय संबंधित कंत्राटदाराने अवैध खनिज उत्खनन केले आहे. प्रत्यक्ष उत्खननाचे मुल्यांकन करून संबंधित कंत्राटदाराकडून दंडासह रॉयल्टी वसूल केली का? असे बरेच प्रश्न अनुत्तरीत आहे.

यावेळी रिपाई ( ए)चे अकोला लोकसभा प्रभारी तथा ठाणे जिल्हा महासचिव सचिन कोकणे ,जिल्हा कार्याध्यक्ष अजय प्रभे, जिल्हासचिव आनंदा कोकणे , जिल्हाउपाध्यक्ष पंजाबराव किर्दक , तालुका अध्यक्ष गौतम अनभोरे, मोहन सिरसाट आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते. वडगाव – कुरुम शिवारात जवळपास १० एक्कराच्या वर वर्ग-२ भुदान जमिनीतून माऊली कंन्स्ट्रक्शन कंपनी मार्फत मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन सुरू आहे. या दरम्यान उत्खनन करताना निंब , बाभूळ यासह ईतर झाडे अडसर ठरत असल्याने त्यांची सर्रास कत्तल करण्यात येत आहे. मोठमोठी झाडे मशीनच्या सहाय्याने तोडून टाकण्यात आल्याची सकृत दर्शनी दिसून येत आहे. विशेष म्हणजे या कंपनीला झाडे तोडण्याची परवानगी नसल्याची विश्वसनीय माहिती आहे .

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment