कोंकण

डॉ. सि. डी. देशमुख नावाला साजेशी वास्तू रोह्यात उभारा, निधीची कमतरता कमी पडू देणार नाही : उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजीत पवार

डॉ. सि. डी. देशमुख नावाला साजेशी वास्तू रोह्यात उभारा, निधीची कमतरता कमी पडू देणार नाही : उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजीत पवार

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून प्रयत्नशील : अर्थमंत्री अजीत पवार

डॉ. सि. डी. देशमुख नावाने आंतरराष्ट्रीय बाग रोह्यात तयार करावी : अर्थमंत्री अजीत पवार

रोहा : रविंद्र कान्हेकर
डॉ. सि. डी. देशमुख यांचे नाव खूप मोठे होते. त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप महत्वाचे योगदान दिले. त्यामुळे त्यांच्या नावाने उभी राहत असलेली वास्तू त्यांच्या नावाला साजेशी अशीच उभी करा, निधीची कमतरता कमी पडू देणार नाही असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

रविवारी 27 फेब्रुवारी रोजी डॉ. सि. डी. देशमुख शहर सभागृहाच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.


अर्थमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला कविवर्य वि. वा. शिरवाडकार, कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त स्मृतीस अभिवादन करून भाषणाला सुरुवात केली.आज मराठी भाषा गौरव दिन आहे, मराठी भाषा फार पुर्वीपासून बोलली जाते यांचे पुरावे असताना आणि सर्वत्र मराठी भाषा बोलली जात असताना, या भाषेचा गोडवा आणि या भाषेत नाट्य परंपरा, साहित्य, कला, लेखन यांचा इतिहास जाज्वल्य आहे. अश्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून राज्य व देश पातळीवर आम्ही प्रयत्नशील आहोत असेही सांगितले.

यावेळी खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री अदिती तटकरे, आ. अनिकेत तटकरे, माजी आमदार सुरेश लाड, जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, रायगड जिल्हा मुख्याधिकारी अनिकेत पाटील, रोहा नगरपरिषद मुख्याधिकारी दयानंद गोरे, राष्ट्रवादी सरचिटणीस विजयराव मोरे, कार्याध्यक्ष मधुकर पाटील, जि. प. उपाध्यक्ष सुधाकर घारे, प्रांताधिकारी डॉ. यशवंतराव माने, उपविभागीय पोलीस अधीक्षक किरणकुमार सूर्यवंशी, माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, नगरसेवक महेश कोल्हटकर, स्नेहा अंबरे, महेंद्र गुजर, तहसीलदार कविता जाधव, पाली नागराध्यक्षा गीताताई पालरेचा, जिल्हा परिषद सभापती गीता जाधव, उपसभापती रामचंद्र सकपाळ, तळा नागराध्यक्ष अस्मिता घोराळकर, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे आदींसह रायगड जिल्ह्यातील पदाअधिकारी व रोहेकर नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यापुढे बोलताना उपमुख्यमंत्री अजीत पवार म्हणाले कि, डॉ. सि. डी. देशमुख शहर सभागृहासाठी 22 कोटी 70 लाख एव्हड्या रकमेचा निधी मंजूर केला असून दर्जेदार सभागृह उभे करा, आणि हे करत असताना आपण एक वर्षात जेव्हढा निधी खर्च कराल तेव्हढा निधी पुढच्या कालावधीत उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले.

पॅनल बोर्ड, रेन वाटर हार्वेस्टिंग व्यवस्था, प्रोजेक्टर रूम, 800 प्रेक्षकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था, कलाकारांना ऑडिटोरियम, लायब्ररी, कॅफे टेरिया, एम. पी. एस. सी व यु. पी. एस. सी विद्यार्थ्यांना घडण्यासाठी व्यवस्था, फायर फायटिंग व्यवस्था व वातानुकूलित सुसज्ज व देखणं सभागृह रोह्यात डॉ. सी. डी. देशामुखांचे होणार आहे.

ब्रिटिश गेल्यानंतर भारतीय चलनावर रोह्याचे सुपुत्र डॉ. सि. डी. देशमुख यांची सही आहे अशी नोंद आज आहे. डॉ. प्रशासकीय कामाच्या 21 वर्षाच्या काळात त्यांनी महसूल, वित्त विभागाचे सचिव म्हणून काम पाहिले. लंडन मध्ये झालेल्या गोलमेज परिषदेचे त्यांनी सचिव म्हणून काम पाहिले.

रिझर्व्ह बँकेचे पाहिले भारतीय गव्हर्नर म्हणून मान मिळवला. एव्हढेच नाही तर देशाच्या अर्थमंत्री पदावरही त्यांनी काम केले. डॉ. सी. डी. देशमुख लंडनला राहत होते त्या बंगल्याला त्यांनी रोहा असे नाव दिले होते.

बागकाम हा डॉ. सि. डी. देशमुख यांचा बागकाम हा आवडता छंद होता. ते मुंबई, पुणे व लंडन अश्या ज्या ज्या ठिकाणी राहिले त्या ठिकाणी त्यांनी आपल्या परिसरात बाग फुलवली होती त्यामुळे रोह्यात प्रशस्त अश्या जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाची बाग तयार करावी असे उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी सांगितले.

क्रीडा साहित्य क्षेत्रात कोंकण भाग नेहमीच पुढे असतो. त्यामुळे पालकमंत्री या नात्याने अदिती तटकरे यांनी माणगाव 50 कोटी रुपायांचे विभागीय क्रीडा संकुल मंजूर केले आहे. याचा फायदा रायगड करांसह ठाणे, पालघर, मुंबई व उपनगर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग अश्या जिल्ह्यांना होणार आहे.

रेवस रेड्डी दहा हजार कोटी रुपायांचे काम मंजूर झाल्याने 93 पर्यटन स्थळे याला जोडली जाणार असून पर्यटनाला चालना मिळणार आहे. रायगड जिल्ह्यातील रोजगाराला चालना मिळणार असून उद्योगाना दर्जा मिळणार आहे. आता 35 हजार स्केवर फूट मध्ये रोह्यात दर्जेदार डॉ. सि. डी. देशमुख यांचे सभागृह उभे राहणार आहे.

खा. सुनील तटकरे

डॉ. सि. डी. देशमुखांच्या नावाने पुन्हा एकदा डौलदार पद्धतीने सभागृह उभे राहत आहे याचा अभिमान आहे. नदीसंवर्धन राज्य व देश पातळीवर होतो पण प्रत्यक्षात कृती होताना दिसत नव्हती. म्हणून मनात विचार आला आणि कुंडलिका नदीकिनारी असलेल्या पडीक जागेवर नदिसंवर्धन करू शकलो.

मागील निवडणुकीत मी खासदार निवडणुकीत पराभूत झालो होतो त्या काळात माझ्यावर पक्षातील खा. शरद पवार व अजित पवार यांनी विश्वास टाकत प्रदेशाध्यक्ष पद देत मला अधिक वेगाने काम करण्यासाठी बळ आले. विरोधी पक्षाच्या बाकावर असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात मी रोह्यात मल्टिफ्लेक्स सिनेमासाठी जागा हस्तांतरण करण्यासाठी प्रयत्न करून खूप कमी बजेटमध्ये जागा हस्तगत केली.

मराठवाडा, विदर्भ, खाणदेश मध्ये शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम करत अर्थमंत्री अजित पवार यांनी परिवर्तन केले. ज्यावेळेस कोंकणात रायगडात निसर्ग चक्रीवादळ आले त्यावेळेस भरीव तरतूद अर्थमंत्री अजित पवार यांनी केली.

पालकमंत्री, अदिती तटकरे

1986 साली सभागृहाची मान्यता मिळाली असली तरी ते काम 14 वर्ष ठप्प झाले होते. खा. शरद पवार व अर्थमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने त्यावेळेस सभागृह वातानुकूलित करून अधिक सुविधा देण्यात आल्या होत्या.

मात्र जुन्या इमारतीच्या तळमजली पाणी साचने यामुळे इमारत धोकादायक झाली असल्या कारणाने डॉ. सि. डी. देशमुख शहर सभागृह अधिक चांगल्या पद्धतीचे कसे करता येईल यासाठी मी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे प्रस्ताव दिला आणि 22 कोटी 70 लाख एव्हड्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून 5 कोटी निधी रोहा नगर परिषदकडे वर्ग झाला आहे.

आ. अनिकेत तटकरे

मा. अर्थमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने नाट्यगृह दुरुस्ती करून तयार झाल्यानंतर साऊंड सिस्टीम व वातानुकूलित सभागृह केल्यानंतर बरेचशे नाट्यप्रयोग रसिकांना अनुभवता आले.आता भव्य वास्तू नव्याने उभी राहत असल्याने 800 प्रेक्षक बसतील अशी व्यवस्था असणार आहे.

नदीसंवर्धन करण्यासाठी 40 कोटी रुपायांचा खर्च करू शकलो. याच ठिकाणी सहा किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारणार आहोत. तसेच 35 फूट उंच शिवाजी महाराजांची प्रतिकृती उभारणार असल्याचे आ. अनिकेत तटकरे यांनी सांगितले.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment