पश्चिम महाराष्ट्र

लाखो भाविक घेतात आगळ्या वेगळ्या महाप्रसाद

पुणे/जुन्नर – ग्रामीण भागात यात्रा म्हटल की महाप्रसाद म्हणून गोड धोड जेवन अनेक ठिकानी बनवल जातं पण, पुणे जिल्ह्यातील आणे गावात रंगदास स्वामी महाराजांच्या यात्रा उत्सवा निमित्त एक अगळा वेगळाच महाप्रसाद बनवला जातो .

गेल्या १५० वर्षांपासून ही परंपरा जुन्नर तालुक्यातील आणे या गावात पार पाडली जाते. ८० क्विंटल बाजरीच्या लाखो भाकरी तसेच ४० जम्बो कढईतली चविष्ट गरमागरम आमटी मागील १५० वर्षापासून सुरु असलेली हि परंपरा आहे. पुणे जिल्ह्यातील आणे येथील रंगदास स्वामी महाराजांचा उत्सवा निमित्त सुरु आसुन भाविकांनी या महाप्रसादाचा आस्वाद घेत आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण या आमटीचा आस्वाद घेताना पाहायला मिळतात.

रंगदास स्वामींच्या मंदिरात दुपारी १२ वाजता आरतीला सुरुवात झाली. आरतीनंतर स्वामींना आमटी आणि भाकरीचा नैवैद्य दाखवला आणि नंतर पंगतीनां सुरुवात झाली. लहान-मोठे असा भेद विसरून एरवी जपल्या जाणाऱ्या आपाआपल्या ओळखी विसरून सारेजण एकत्र पंगतीला बसतात. सर्वांसाठी प्रसादही एकच असतो.

आणे गाव परिसरातील सर्व वाड्या वस्त्यांवरून घरा- घरातून भाकरी जमा केल्या जातात. तर मंदिर परिसरातच आमटी तयार केली जाते. त्यासाठी १५ प्रकारच्या वस्तू व तब्बल ८ लाखाचे मसाले आणि डाळी वापरल्या जातात. त्यामुळे पुणे जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यभरातून या आमटीचे भाविक चाहते आहेत. या आमटी भाकरीचा आस्वाद घेण्यासाठी भाविक राज्यभरातून येथे दाखल होत आहेत.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment