महाराष्ट्र मुंबई

टपरीवर विकला जाणार लाखोंचा गुटखा नवी मुंबई पोलिसांनी केला जप्त

नवी मुंबई – नवी मुंबईतील तुर्भे परिसरामध्ये एका टपरीवर परवानगी नसताना गुटखा विक्री करत असल्याची माहिती तुर्भे पोलिसांना मिळाली, असता पोलिसांनी एका व्यक्तीला ग्राहक बनवून पाठविले आणि मग टपरी चालक पोलिसांच्या रडारवर आला. तात्काळ टपरी चालकाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता,टपरीच्या आसपास अनेक प्रकारचा अवैद्य पद्धतीने साठवणूक करून ठेवलेला जवळपास १ लाख ३० हजारांचा गुटखा पोलिसांनी ताब्यात घेतला असून टपरी चालकलाही अटक करून पोलीस कोठडी सूनविण्यात आली आहे. तौकीर निसारुद्दीन खान वय ३६ वर्ष राहणार खेरनेगाव हाजी कंपाऊंड रूम क्रमांक २ खैरणेगाव असे अटक आरोपीचे नाव आहे.

राज्यात बंदी असलेला गुटखा विक्री प्रकरणी तुर्भे पोलिसांनी एका आरोपीस जेरबंद केले आहे. आरोपी कडून १ लाख २९ हजार ३६० रुपयांचा गुटका जप्त करण्यात आला आहे. पोलीस सह आयुक्त,नवी मुंबई यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तलयाचे हद्दीमध्ये अवैधरित्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणारे विक्रीसाठी जवळ बाळगणारे व त्याचा पुरवठा करणारे किंवा त्याची वाहतूक करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याची विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिलेले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करत असताना तुर्भे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले संग्राम साबळे व पथकाने तुर्भे पोलीस हद्दीमध्ये बुधवारी गोपनीय माहिती द्वारे शर्मा पान टपरी ड्रम गल्ली तुर्भे स्टोअर, येथे छापा टाकला .

छाप्यादरम्यान नमूद ठिकाणी गोवा पान मसाला, जी १ जर्दा, विमल पान मसाला व गुटखा, रोकडा पान मसाला व गुटखा, डी एस पान मसाला व गुटखा, राजनिवास पान मसाला व गुटखा, असा एकूण १लाख २९ हजार३६० रुपये किमतीचा विक्री व पुरवठ्यासाठी मोठ्या प्रमाणात ठेवलेला गुटख्याचा साठा मिळून आला.सदर आरोपीविरुद्ध तुर्भे पोलीस ठाणे येथे खालीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ सह अन्नसुरक्षा आयुक्त महाराष्ट्र राज्य अधिसूचना नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच नवी मुंबई नशा मुक्त करण्यासाठी आमचे हे पाऊल असून आणखी कुठे असे धंदे सुरू आहेत का? याचा शोध सुरू असल्याचे तुर्भे पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी सांगितले.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment