मनोरंजन

आठवणीतल्या दीदी : फळे खाल्ली नाही तर काही जीव जाणार नाही

फळे खाल्ली नाही तर काही जीव जाणार नाही
दररोजचा मंगळवार पेठ ते शालिनी स्टुडिओपर्यंतचा सायकल प्रवास, आर्थिक परिस्थितीमुळे पोटभर अन्न मिळण्यात येणारी अडचण व दगदग यामुळे लतादीदींची तब्येत बिघडली. 

तो काळ होता 1943 ते 1947. पोटात अन्न कमी आणि त्यात सायकल प्रवासाच्या दगदगीने एकदा लतादीदींना खूपच अशक्तपणा आला. 

त्या डॉक्टरांकडे गेल्या तेव्हा औषधांसोबत फळे किंवा सुकामेवा खाण्याचा सल्ला डॉक्टारांनी दिला. 

सुकामेव्याचा तर दीदींनी विचारच सोडून दिला, पण जर मास्टर विनायक यांनी पगार थोडा वाढवला तर फळे खाता येतील या विचाराने दीदी मास्टर विनायक यांच्याकडे गेल्या. 

त्यावेळी विनायक हे फलाहार करत बसले होते. त्याकाळात मास्टर विनायक यांच्यासाठी मुंबईहून चांगल्या दर्जाची फळे येत असत. दीदींनी डॉक्टरांचा सल्ला मास्टर विनायक यांना बोलून दाखवला. 

मला फळे खाण्यास सांगितले आहे तेव्हा पगारात पाच रूपये वाढवून दय़ावे असे दीदी सांगताच विनायक म्हणाले, कशाला हवीत फळे खायला… 

एक भाकरीच जास्त खा. 

माणसाने आपले अंथरूण पाहून पाय पसरावेत. फळे खाण्यासाठी पगारवाढ दय़ायला जमणार नाही.

 मास्टर विनायक यांच्या त्या उत्तराने लतादीदी माघारी फिरल्या. 

पुढे कित्येक दिवस पोटात आग पडली की कोल्हापुरातील गंगाराम चुरमुरेवाले यांच्याकडील चुरमुरे खाऊन त्यावर पाणी पित लतादीदी ढेकर दय़ायच्या. 

बाजारात फळे दिसली की त्यांना विनायक यांचे शब्द आठवायचे आणि फळे खाण्याची त्यांची इच्छाच मरायची.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment