गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज वयाच्या 93 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झालं..
त्यांच्या जाण्याने त्यांच्या कोल्हापुरातील आठवणींना देखील उजाळा मिळालाय..
मूळचं सांगलीचं हे मंगेशकर कुटुंबीय कोल्हापुरात दहा वर्ष भाड्याच्या घरात राहण्यासाठी होतं.. कोल्हापुरातील लक्ष्मण कारेकर यांच्या घरी अवघ्या दहा रुपयाच्या भाड्यावर हे मंगेशकर कुटुंबीय राहत होतं..
तीन खोल्यांच्या या छोटेखानी भाड्याच्या घरात लता मंगेशकर, आशा भोसले उषा मंगेशकर हृदयनाथ मंगेशकर या भावंडांचे बालपण गेलं..
त्या वेळी आर्थिक विवंचनेत असलेल्या कुटुंबियांना कारेकर कुटुंबीयांनी वेळोवेळी मदत ही केली होती.. आज लतादीदींच्या निधनाची बातमी आल्यानंतर कारेकर कुटुंबीयां दिदींसोबतच आपल्या आठवणी ताज्या केल्या…