अमरावती – राज्य सध्या लावणी कलावंत गौतमी पाटील यांच्या लावणीवरून वाद प्रतिवाद सुरू आहे. अशातच अमरावती येथील कलावंतांनी आपल्या लावणीच्या जोरावर दिल्लीतील नागरिकांची मने जिंकत वाहवा मिळवली आहे.
दिल्ली येथील प्रसिद्ध फाउंडेशनच्या वतीने दिल्ली इंटरनॅशनल आर्ट अँड कल्चर फेस्टिवल चे आयोजन करण्यात आले होते. अमरावती येथील नाट्य कलावंत डॉक्टर राहुल हाडदे यांच्या मार्गदर्शनात पश्चिम विदर्भातील अनेक लावणी कलावंतांनी या आर्ट फेस्टिवल मध्ये सहभाग नोंदविला. दिल्लीत सध्या कडाक्याची थंडी पडत आहे अशातच भल्या पहाटे सुमधुरसुर हार्मोनियम आणि ढोलकीचा आवाजावर थाप देत सराव करणाऱ्या नर्तकींनी मॉर्निंग वॉक करणाऱ्या दिल्लीतील नागरिकांची मनी जिंकत वाह वाह मिळवली त्या इथेच थांबल्या नाही तर त्यांनी आपल्या लावणीची जादू दाखवत आर्ट फेस्टिवलचा स्टेजही गाजवला.