पश्चिम महाराष्ट्र

लॉजवर सुरु होता हा उद्योग पोलिसांच्या छाप्यात सत्य आले समोर

कोल्हापुर – करवीर तालुक्यातील कंदलगाव येथे अवैधरित्या सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर स्थानिक गुन्हे अन्वेषण व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने छापा टाकत दोन तरुणांना अटक केली आहे तर एका पीडित महिलेची सुटका करत तब्बल ७० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई कंदलगाव येथील वंडरला लॉजिंग अँड रेस्टॉरंटवर येथे करण्यात आली आहे.

मिळालेली माहिती अशी की, भारती विद्यापीठ रोडवर कंदलगाव हद्दीत वंडर लॉजिंग अँड रेस्टॉरंटमध्ये काही काळापासून वेश्या व्यवसाय सुरू असल्याची परिसरात दबक्या आवाजात चर्चा सुरू होती.गरीब, गरजू महिलांना लॉजिंगवर बोलावून तेथे त्यांना शरीरविक्रयास प्रवृत्त करण्यात येत होते. यामध्ये महेश अमृत जाधव (वय ३०, रा. नेर्ली, ता. करवीर) व अमोल तानाजी माने (३८ शहाजी वसाहत, शिवाजीपेठ) हे स्वत: वेश्या व्यवसाय चालवित असल्याची माहिती प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाली. पोलिस निरीक्षक संजय गोर्ले व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाच्या सहायक पोलिस निरीक्षक श्रद्धा आंबले यांनी सोमवारी सायंकाळी छापा टाकून ही कारवाई केली. यावेळी संशयित महेश जाधव व अमोल माने या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून मोबाईल, रोख रक्कम असा ७० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वेश्या व्यवसायासाठी लॉजवर बोलाविण्यात आलेल्या पीडित महिलेची पथकाच्या वतीने सुटका करण्यात आली. पथकात फौजदार राजेंद्र घारगे, रवींद्र गायकवाड, किशोर सूर्यवंशी, मंनाक्षी पाटील, तृप्ती सोरटे सहभागी झाले होते.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment