क्रीडा

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी लक्ष्मण मुख्य प्रशिक्षक

राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मणची झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे, अशी माहिती ‘बीसीसीआय’चे सचिव जय शहा यांनी दिली.

नवी दिल्ली : राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मणची झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे, अशी माहिती ‘बीसीसीआय’चे सचिव जय शहा यांनी दिली.

आशिया चषक स्पर्धेपूर्वी हा दौरा होणार आहे. आशिया चषक आणि झिम्बाब्वे दौरा यांच्यात खूपच कमी अंतर आहे. झिम्बाब्वे दौऱ्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार असून, अखेरचा सामना २२ ऑगस्ट रोजी होणार आहे. आशिया चषकासाठी भारतीय संघ प्रशिक्षक द्रविडसह २३ ऑगस्ट रोजी संयुक्त अरब अमिरातीत दाखल होणार आहे. त्यामुळेच झिम्बाब्वे दौऱ्यासाठी लक्ष्मणकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवल्याचे शाह यांनी सांगितले.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Comment