पश्चिम महाराष्ट्र

परदेशातील शिक्षण सोडून आली आणि थेट सरपंच झाली

सांगली – राजकारणातील प्रताप पाहून उच्चशिक्षितांकडून राजकारणाला नाके मुरडली जात असतानाच सांगली जिल्ह्यात याला अपवाद ठरावी, अशी घटना ग्रामपंचायत निवडणुकीत घडली आहे. जॉर्जियात वैद्यकीय शिक्षण घेतलेली फॉरेन रिटर्न यशोधरा महेंद्रसिंह शिंदे ही सांगली जिल्ह्यातील ‘वड्डी’ ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदी निवडून आली आहे. यशोधराराजे शिंदे या सर्वात तरुण महिला सरपंच देखील ठरल्या आहेत. या निवडणुकीत शिंदे यांच्या पॅनलचा एकतर्फी विजय झाला असून सर्व जागेवर उमेदवार निवडून आले आहेत.

सांगली जिल्ह्यातील सुमारे पाच हजार लोकवस्तीचं छोटंसं गांव वड्डी. मिरज शहरालगत असणारे गाव आहे. या गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत विकासाचा मुद्दा उपस्थित करतपरदेशाप्रमाणे शुद्ध पिण्याचे पाणी, शिक्षण, आरोग्य आणि नागरी सुविधा गावकऱ्यांपर्यंत पोहोचत का नाहीत? या विचारातून या मुलीने थेट निवडणूक रिंगणात उडी घेतली. 

शाळेत शेकड्यांने विद्यार्थी विद्यार्थिनी असताना सगळ्यात मिळून एकच कॉमन टॉयलेट का? विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार ते का नाहीत? परदेशासारखे शाळेत किंवा काही विशिष्ट ठिकाणी सेनेटरीपॅडचे व्हेंडिंग मशीन्स आपल्या गावखेड्यात का नाहीत? असे प्रश्न घेवून निवडणुकीचा प्रचार केला. यशोधराने परदेशात पाहिला तसाच गाव समाज माझ्या गावात झाला पाहिजे हे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून निवडणूक लढवली. तसे विकासाचे मॉडेल गावागावात विकसित व्हायला पाहिजे, अशी अपेक्षा ती व्यक्त करताना दिसते.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment