महाराष्ट्र

निगडी येथे विहिरीत पडलेल्या सांबराला जीवदान | Maharashtra Maza 2022

निगडी येथे विहिरीत पडलेल्या सांबराला जीवदान | Maharashtra Maza 2022

निगडी येथे विहिरीत पडलेल्या सांबराला जीवदान *

पायामध्ये शिकारीचा फासा आढळला, उपचारानंतर सुटका

निगडी (ता.सातारा)

येथील एका विहिरीमध्ये पडलेल्या सांबराला तब्बल ८ तासाच्या अथक प्रयत्नानंतर जीवदान देण्यात वनविभागाच्या पथकाला यश आले. दरम्यान पायामध्ये शिकारीचा फासा लागून जखमी होऊन सांबर विहिरीत पडल्याचा प्राथमिक निष्कर्ष असून उपचार केल्यानंतर त्याची सुखरूप सुटका केली असल्याची माहिती सातारा तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ. निवृत्ती चव्हाण यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की शनिवारी सायंकाळी निगडी येथील शिवारात असणाऱ्या एका विहिरीमध्ये सांबर पडल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले.याची माहिती त्यांनी वनरक्षक राजू मोसलगी यांना दिली. माहिती मिळताच वन विभागाचे रेस्क्यू पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तब्बल २०० ते २२५ किलो वजनाचा नर जातीचा सांबर विहिरीत पडला असल्याचे लक्षात येताच वनविभागाने स्थानिक लोकांच्या मदतीने दोरखंड व जाळीचा वापर करून मदतकार्य सुरू केले. रात्री उशिरा या सांबराला सुखरूपपणे बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले. सांबर अत्यंत घाबरलेल्या परिस्थितीत दिसून येत होते. त्याच्या अंगावर उबदार कपडे टाकून त्याला शांत करण्यात आले. त्याची वैद्यकीय तपासणी केली असता त्याच्या मागील उजव्या पायात शिकारीसाठी वापरण्यात येणारा फासा अडकलेला असल्याचे निदर्शनास आले. कर्मचाऱ्यांनी त्याच्या पायातील फासा काढून टाकला.यावेळी त्याचा जखमांवर मलमपट्टी करण्यात आली आणि त्याचा थकवा दूर करण्याकरिता इतर उपचार करण्यात आले.प्रथमोपचार करताच सांबर बऱ्यापैकी सावरले. तदनंतर त्याची सुटका करण्यात आली. सांबराला जीवदान देण्यात वनविभागाचे वन क्षेत्रपाल डॉ. निवृत्ती चव्हाण, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चंदन सवणे, वनपाल कुशाल पावरा, वनरक्षक राजू मोसलगी, सुहास भोसले, महेश सोनवले, श्रीकांत दुर्गे, गोरख शिरतुडे, शैलेश देशमुख, सुमित वाघ, दिपक मच्छे तसेच निगडीचे सरपंच सुभाष शामराव पवार, धनंजय बबन पवार, अण्णा मारुती जाधव, सागर प्रकाश मसुगडे, तुषार विजय पवार, प्रदीप तुळशीदास जाधव, रोहित व्यंकट पवार, महेश धनाजी भोईटे, प्रीतम आप्पासो पवार, यांनी परिश्रम घेतले. बचावकार्य सहायक वन संरक्षक सुधीर सोनवले, उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडले. सांबर हा एक हरीण वर्गातील प्राणी असून हा भारतभरात आढळतो. या जातीचे नर प्राणी १८५ ते २६० किलो वजनाचे असतात. सप्टेंबर ते जानेवारी या काळात यांचा प्रणयकाळ दिसून येतो. इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्सरवेशन ऑफ नेचर या आंतरराष्ट्रीय संस्थेने या जातीचे अस्तित्व असुरक्षित असल्याचे जाहीर केले आहे ज्या मागचे प्रमुख कारण हे मानवाचा निसर्गातील वाढता हस्तक्षेप तथा शिकार आहव अशी माहिती वनक्षेत्रपाल डॉ.निवृत्ती चव्हाण यांनी दिली.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Comment