पिंपरी – पिंपरी चिंचवड परिसरात गुन्हेगारीचे दिवसेंदिवस डोके वर काढले आहे. दररोज खुनाच्या घटना समोर येत आहेत. अशीच एक.घटना पिंपरी चिंचवड हद्दीतील महाळुंगे परिसरात किरकोळ वादातून एक व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याची घटना घडली आहे. आरोपी पळुन जाण्याच्या तयारीत असताना आरोपीला म्हाळुंगे पोलिसांनी सापळा रचून अवघ्या चार तासात जेरबंद केले आहे.
दीपक काशिनाथ राठोड( वय ३५) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून विठ्ठल मंगेश चव्हाण ( वय २२). असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी विठ्ठल चव्हाण आणि दीपक राठोड रूमवर रहात होते. त्या दोघांनाही दारूचे मोठ्या प्रमाणावर व्यसन होते. अनेकदा ते दारू पिऊन घरी यायचे. चाकण परिसरात ते दोघेही कामाला होते. एका रात्री दोघेही दारू पिऊन जवळ असलेल्या चायनीज गाडीवर जेवन करण्यासाठी आले होते, जेवणादरम्यान त्या दोघात वाद सुरू झाला. तेव्हा त्यांचा किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यावेळी दारूच्या नशेत असणाऱ्या दीपक राठोड सोबत त्याची झटापट झाल्याने त्यात विठ्ठल याने रस्त्यावर पडलेला दगड त्याने दिपकच्या डोक्यात घातला. आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. खून केल्यानंतर नंतर तो घतांनास्थकवरून फरार झाला. स्थानिकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत आरोपीचा शोध घेण्यासाठी सापळा लावला आणि त्याला अवघ्या चार तासात पळून जाण्याच्या तयारीत असताना ताब्यात घेतले. पोलिसांनी हिसका दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.