अमरावती – मैत्रीचे रूपांतर प्रेमात आणि प्रेमाचा पुढला टप्पा म्हणजे लग्न, ज्याच्यावर जीव ओवाळून सात फेरे घेण्याचे स्वप्न पाहिले, त्याच प्रियकराने प्रेयसीला गर्भपात कर, अन्यथा खल्लास करून टाकेन धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार अमरावती मध्ये घडला.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अविनाश लक्ष्मण मगीरवार (वय ३७, रा. नांदेड) असे आरोपीचे नाव आहे. अविनाशची जानेवारी २०१९ मध्ये येथील ३२ वर्षीय तरुणीसोबत ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाल्यावर अविनाशने पीडित तरुणीचा विश्वास संपादन करून केला तिला प्रेमजाळ्यात ओढले. त्यानंतर दोघा ‘लिव्ह इन रिलेशनशिपमधला संसार सुरू झाला. या काळात अविनाशने पीडित तरुणीचे वारंवार लैंगिक शोषण केले. त्यातून पीडित तरुणीला गर्भधारणा झाली. याबाबत अविनाशला कळल्यावर त्याने गर्भपात कर, अन्यथा तुला जिवाने मारेल, अशी धमकी पीडिताला दील्याने तिच्या पाया खालची वाळूच सरकली. याप्रकरणी पीडित तरुणीने राजापेठ ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी अविनाशविरुद्ध गुन्हा नोंदविला.