पश्चिम महाराष्ट्र

लोको पायलेट गायब

पुणे – वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून पुणे रेल्वे चालकांमध्ये एक लोको पायलेट दोन दिवसापासून गायब झाल्याने पुणे रेल्वे स्थानकामध्ये खळबळ माजली आहे. हा लोको पायलेट गेले दोन दिवसापासून घरीही परतल्या नसल्याने त्याच्या पत्नीने चिंता व्यक्त केली आहे. हरिषचंद्र अंकुश असा या लोको पायलटच नाव आहे. शुक्रवारी अकरा तासांचे काम करून घरी निघाले नंतर, वरिष्ठांनी त्यांना आणखी चार ते पाच तास कामावर थांबण्याची सूचना दिली. त्याबाबत तगादा लावण्यात आला. ते शक्य नाही असं सांगून विश्रांतीची गरज आहे. असा बोलून अंकुश कार्यालयातून निघून गेले.त्यानंतर वरिष्ठांनी त्यांच्याशी फोन करून संवाद साधला, आणि ऐकले नाही, तर बदली करिन अशी धमकी दिली. अशी माहिती अंकुश यांच्या पत्नीने दिली आहे.

शनिवारपासून अंकुश गायब आहेत. सोमवारीही ते घरी किंवा नोकरीवर परतले नाहीत. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांसह त्यांच्या पत्नीने चिंतेत आहेत. याप्रकरणी नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे सचिव सुनील बाजारे आक्रमक होत. संबंधितांवर कठोर कारवाही करण्याची मागणी केली आहे. त्याचसोबत कामबंदचा इशाराही दिला आहे. त्याचप्रमाणे संबंधित रेल्वे चालकच्या पत्नीने पुणे रेल्वेच्या व्यवस्थापक इंदूराणी दुबे यांची भेट घेऊन त्यांना निवेदनही दिले आहे.

पत्नीने सोमवारी पुणे रेल्वे व्यवस्थापक कार्यालयासमोर आंदोलन केले. ४८ तासांमध्ये त्यांना शोधून आणा, अन्यथा पुण्याहून एकही रेल्वेचालू देणार नाही, असा इशारा अंकुश यांच्या पत्नी सह कर्मचाऱ्यांनी रेल्वे प्रशासनाला दिला. त्याचप्रमाणे दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीही करण्यात आली.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment