मुंबई

लोकलावंतांचे आमरण उपोषण मागे

मुंबई – येत्या महिन्याभरात राज्यातील लोककलावंतांना कोरोना अनुदान पॅकेजची आर्थिक मदत देण्यात येईल. तमाशा सम्राज्ञी कै विठाबाई नारायणगावकर यांचे स्मारक उभे करण्यासाठी लवकरच मंत्रीस्तरावर बैठक आयोजित केली जाईल. असे आश्वासन सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात यांनी आमरण उपोषणाला बसलेल्या लोकनाट्य,लोककलावंत मराठी परिषदेच्या शिष्टमंडळाला आज मंत्रालयात झालेल्या एका बैठकीत दिले. त्यामुळे सदर आंदोलन मागे घेण्यात आले.

लोकनाट्य, लोककलावंत मराठी परिषदेचे अध्यक्ष संभाजीराजे जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळ पासून आझाद मैदानावर राज्यातील लोककलावंतांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले होते या आंदोलनात शेषराव गोपाळ(धुळे),हसनशेख पाटेवाडीकर(नगर), रेखा पाटील कोल्हापूरकर, राजेश काशीद,गणेश डोंगरे, सुनिल वाडेकर(कराड),सुभाष जाधव(मुंबई)। वगसम्राट दादु इंदूरीकर प्रतिष्ठानचे(मुंबई) सरचिटणीस अशोक सरोदे (इंदूरीकर),लोककलेचा अभ्यासक बाबाजी कोरडे यांच्या सह आदी कला क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश होता.

कार्यक्रमाच्या ठिकाणी पोलिस संरक्षण देणे, तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार निवड समिती बरखास्त करणे, सांस्कृतिक कार्यक्रमाच्या परवाने एक खडकी योजनेअंतर्गत आणणे. लोककलावंतांच्या मानधनात वाढ करणे, निवडणुकीच्या काळात आचार संहितेच्या बाबतीत पोलीस खात्याकडून होणार त्रास कमी होण्यासाठी निवडणूक आयोगाला पत्रव्यवहार करणे. आदी मागण्यांवर आज मंत्रालयात सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात यांच्या दालनात सविस्तर चर्चा झाली. संघटनेचे अध्यक्ष जाधव यांनी सदर बैठकी आपली भूमिका ठाम मांडली. यावर सरकार निश्चित सकारात्मक निर्णय घेईल. असे आश्वासन यावेळी थोरात यांनी उपोषणला बसलेल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी एका पत्रकाव्दारे या आंदोलनाला जाहीर पाठींबा दिला.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment