महाराष्ट्र

महाराष्ट्रात तिसरी लहर

  • महाराष्ट्रात तिसरी लहर

कहर बरसण्याआधी शासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांची मोर्चेबांधणी सुरु

तिसरी कसम घेतल्यासारखे कोवीड फिरुन तिसर्‍या लाटेवर स्वार होऊन थैमान घालण्यास सज्ज आहे. त्याच्या प्रकृतीनुसार दरवेळेस तो नवनवीन व्हेरियंटसह हल्ला बोल करीत असतो या वेळेस ओमिक्रॉन व्हेरियंटच्या स्वरूपात कामाला लागला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेकडून ओमिक्रॉन व्हेरियंट डेल्टा व्हेरियंट पेक्षा अधिक घातक असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ओमिक्रॉन कोरोनाव्हायरसचा आतापर्यंतचा सर्वाधिक बदल किंवा म्युटेशन झालेला विषाणू आहे. यामध्ये झालेल्या म्युटेशनची यादी एवढी मोठी आहे की, शास्त्रज्ञांनी याचं वर्णन “भयावह” आणि आतापर्यंतचा कोरोना विषाणूचा हा सर्वात वाईट प्रकार असल्याचं म्हटलं आहे.

केंद्र सरकारच्या माहितीनुसार, भारतात फेब्रुवारी 2021 मध्ये आढळून आलेल्या डेल्टा व्हेरियंट मध्ये स्पाईक प्रोटीनमध्ये 8 म्युटेशन आढळून आले होते. मात्र ओमिक्रॉन व्हेरियंटमध्ये डेल्टापेक्षा खूप जास्त प्रमाणात म्युटेशन झालेत. ओमिक्रॉन व्हेरियंट मध्ये एकूण 50 म्युटेशन आढळलेत. त्यापैकी 30 पेक्षा अधिक स्पाईक प्रोटीन वर आढळल आहेत. या दोन व्हेरियंटनधील विशेष फरक म्हणजे शरिरातील पेशींच्या ज्या भागाशी विषाणूचा सर्वप्रथम संपर्क येतो, याचा अभ्यास केला असता ओमिक्रॉनमध्ये 10 म्युटेशन, तर जगाला हादरा देणाऱ्या डेल्टा व्हेरिएंटमध्ये या भागात केवळ 2 म्युटेशन झालेले होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण होण्याची भीती जास्त असल्याचं प्राथमिकदृष्ट्या दिसून येतंय.

राज्यातील परिस्थिती

राज्यात गेल्या दहा दिवसांत रुग्णसंख्या चारपटींहून अधिक वाढली आहे. परंतु तूर्तास नवीन रुग्णांच्या तुलनेत मृत्यू कमी (०.४४ टक्के) असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमाच्या अहवालात दिसत आहे. २२ डिसेंबर २०२१ ते १ जानेवारी २०२२ दरम्यान राज्यात दहा दिवसांत एकूण १५८ मृत्यू झाले, हे विशेष.

देशातील ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळत असून येथे दहा दिवसांत झटपट करोनाचे संक्रमण वाढण्याची गती बघता हा विषाणू पाय पसरत असल्याची शंका व्यक्त होत आहे. अहवालानुसार २२ डिसेंबर २०२१ ते 10 जानेवारी २०२० या दहा दिवसांत राज्यात करोनाचे 45 हजार ८२५ नवीन रुग्ण आढळले.

नागपूरातील बाधितांची संख्या

गेल्या तीन दिवसांतील आकडेवारी दोन हजारांपेक्षा जास्त आहे. २४ तासांमध्ये जिल्ह्यात ८३२ नवे बाधित आढळून आले आहे. यात शहरातील ७२३ जणांचा समावेश असून ग्रामीण भागातील ८० जणांचा समावेश आहे. जिल्ह्याबाहेरील २९ जण बाधित आढळले.

त्यामुळे बाधितांची संख्या ४ लाख ९७ हजार ५८८ पर्यंत पोहोचली आहे. तीन जानेवारीपासून बाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. आठवडाभरात ३ हजार २६२ बाधित आढळून आले. त्यामुळे जिल्हा, महापालिका प्रशासनाने निर्बंध जाहीर केले असून नागरिकांना कोविड नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नागपुरात बाधितांची संख्या कमी होती. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून कोरोना बाधितांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले असतानाच नागपुरात 133 कोरोनाबाधितांची नोंद झाल्याने प्रशासन काळजीत पडले. सहा महिन्यांपासून सातत्याने एक आकडी असलेली कोरोना बाधितांची संख्या अचानक तीन आकडी आली आहे. निर्बंध घातल्यानंतरही कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्यानं प्रशासन आणि आरोग्य विभागाची चिंता वाढली.

सरकारकडून निर्बंध लावण्यास सुरुवात

राज्यात तिसऱ्या लाटेचा शिरकाव झालाय असं तज्ञांचं मत असून कोरोनाचे आकडे भयंकर पद्धतीनं वाढत आहेत. राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर रविवारी रात्रीपासून राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.

  • 15 फेब्रुवारीपर्यंत शाळा आणि कॉलेज बंद
  • स्विमिंग पूल, जीम, स्पा, वेलनेस सेंटर, ब्युटी पार्लर बंद
  • सर्व पर्यटन स्थळं बंद
  • प्राणी संग्रहालय, फोर्ट, म्युझियम, एन्टरटेन्मेंट पार्क पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहे
  • हॉटेल रात्री 10 ते सकाळी 5 हॉटेल बंद राहणार आहे.
  • सरकारी कार्यालयात भेटणाऱ्यांना निषेध
  • डोमॅस्टिक फ्लाईट्ससोबतच ट्रेन, रोड-वे ने राज्यात प्रवास करत यायचे असल्यास संपूर्ण लसीकरण किंवा आरटीपीसीआरचा निगेटीव्ह रिपोर्ट 75 तासांपूर्वीचा बंधनकारक आहे. ड्रायव्हर, क्लीनर आणि स्टाफला देखील नियम लागू आहेत. धार्मिक स्थळांबाबत मात्र नियमावलीत कुठलाही उल्लेख करण्यात आलेला नाही.

राज्यातील मंत्री आणि आमदारांना कोरोनाची लागण

महाराष्ट्रातील मंत्रिमंडळातील अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, पंकजा मुंडे, सुप्रिया सुळे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यात आंणखिही काही नाव सामील होण्याची शक्यता आहे.

कोरोनाच्या आताच्या परिस्थितीवर लॉकडाऊनचा निर्णय नाही. लॉकडाऊनविषयी कुठेही चर्चा नाही असे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. बेड आणि ऑक्सिजनच्या उपलब्धतेवर पुढील निर्णय घेतल्या जातील असेही सांगण्यात आले आहे.

’2 आउट ऑफ 3’ फॉर्म्युला

ओमायक्रॉनच्या वाढता धोका रोखण्यासाठीच्या उपाय योजनांबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. याबाबत अमेरिकेतील जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या सार्वजनिक आरोग्याच्या प्राध्यापिका डॉ. लीना वेन यांनी ’2 आउट ऑफ 3’ चा फॉर्म्युला सांगितला आहे. या फॉर्म्युलानुसार कोरोनापासून बचाव करण्यासाठी सर्व लोकांनी तीनपैकी किमान दोन संरक्षणात्मक नियमांचं पालन केलं पाहिजे. कोरोनाला रोखण्यासाठी लस, मास्किंग आणि चाचणी हे तीन संरक्षणात्मक नियम प्रभावी ठरत असल्याचे दिसून येत आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment