मनोरंजन

महेश मांजरेकर सांगणार त्या सात वीरांची गोष्ट

भालजी पेंढारकर यांनी शिवाजी महाराजांच्या काळातील अनेक प्रसंगांवर सिनेमे बनवले होते. पुन्हा तो काळ सध्या गाजत आहे. शिवकाळातील सिनेमांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

याच पंक्तीत आता दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी वीर दौडले सात या सिनेमाची घोषणा केली आहे. वो सात या नावाने हा सिनेमा हिंदीतही प्रदर्शित होणार आहे.

ऐतिहासिक सिनेमांची ही परंपरा गेल्या काही वर्षात पुन्हा जपली जात आहे. शिवकाळातील एक पराक्रमी पान उलगडण्यासाठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी पाऊल पुढे टाकलं आहे.

शिवकाळातील सात वीरांचे महत्त्व सिनेमातून मांडण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ सिनेमाच्या रूपाने पुन्हा एकदा मोठ्या पडदयावर येत आहे.

चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनातील अनेक प्रसंग, घटनांवर आधारीत सिनेमे बनवून एक इतिहास घडवला आहे.

शिवाजी महाराजांच्या याच सात वीरांच्या शौर्यावर महेश मांजरेकर यांच्या नव्या सिनेमाची उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे. सध्या शिवकालीन सिनेमांचा ट्रेंड जोरात सुरू आहे.

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित फत्ते शिकस्त, फर्जंद, पावनखिंड, शेर शिवराज या सिनेमांना मिळालेल्या यशामुळे प्रेक्षकांना शिवकाळातील सिनेमा आवडत असल्याचे दिसत आहे.

त्यामुळेच महेश मांजरेकर यांच्या वीर दौडले सात या सिनेमाच्या घोषणेने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. या सिनेमात प्रतापराव गुजर यांच्यासह अन्य सहा वीरांच्या भूमिकेत कोण असणार हे अद्याप निश्चित नाही.

येत्या दिवाळीत वीर दौडले सात हा मराठी सिनेमा तर वो सात या नावाने हिंदी सिनेमा पडद्यावर येणार आहे. महाराष्ट्र दिनी महेश मांजरेकर यांनी ही घोषणा करताच शिवप्रेमी आणि ऐतिहासिक सिनेमाप्रेमींच्या उत्साहाला उधाण आलं आहे.  

विशेष म्हणजे हा सिनेमा एकाच वेळी मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. याबाबत महेश मांजरेकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टचे प्रेक्षकांकडून स्वागत होत आहे.

बहलोलखान नावाचा आदिलशाही सरदार मराठा स्वराज्यात धुमाकूळ घातल होता. मराठ्यांच्या गनिमी काव्याने बहलोलखानला बेजार केले. शरण आलेल्या बहलोलखानला  प्रतापरावांनी त्याला समज देऊन सोडून दिले. पण दगाबाज बहलोलखान पुन्हा स्वराज्यावर चालून आला.  

अशा दगाबाजाला सोडून दिल्याबद्दल शिवाजी महाराज प्रतापरावांना म्हणाले होते की, बहलोलखानाला पकडल्याशिवाय मला तोंड दाखवू नका. शिवरायांचे हे वाक्य गुजर यांच्या जिव्हारी लागले.

त्यांनी आपल्या सहा सहकाऱ्यांसोबत कूच केली. या सात वीरांमध्ये होते विसाजी बल्लाळ, दीपोजी राऊतराव, विठ्ठल अत्रे, कृष्णाजी भास्कर, सिध्दी हिलाल आणि विठोजी शिंदे. शौर्याच्या वेडात हे सात वीर बहलोलखानावर धावले, पण अखेर त्या सात वीरांना यशस्वी होण्यासाठी जीव गमवावा लागला.

इतिहासाच्या पानावर या सात वीरांची कथा आजही लखलखीत आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment