मराठवाडा

१४ तारखेला येणारी मकर संक्रात आता पंधरा तारखेला येते,वैज्ञानिक म्हणाले

चंद्रपूर – मकर संक्रांतीच्या मागील तारखा पाहील्यास इसण २७२ मध्ये मकर संक्रांत १४ जानेवारी महिन्यात येत असे,पुढे इ सन १००० मध्ये ती ३०डिसेंबरला येत होती, नंतर गेल्या ५० वर्षांपासून ती १४ जानेवारीला येत आहे आता मात्र ती १५ तारखेला आली. पुढील ९००० वर्षात ती जून मध्ये येणार आहे. अशी माहिती खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली.

मकर संक्रांत आणि उत्तरायण हे वेगवेगळ्या दिवशी येत असतात. २२ डिसेंबरला उत्तरायणची सुरुवात तर १४ जानेवारीला मकर संक्रांत होत असते. बहुदा इस २७२ वर्षात उत्तरायण आणि मकर संक्रांत २२ डिसेंबरलाच होत असावी. तेव्हापासून मकर संक्रात हा सण १४ तारखेलाच साजरी केली जाते. बहुतेक हा सण चंद्र कालगणना पध्दतीने साजरी केली जाते. परंतु मकर संक्रांत ही सूर्य कालगणना पध्दतीने साजरी केली जाते. पूर्वी दोन्ही दिवस एकाच दिवशी येत असल्याने असे घडले असावे, असे चोपणे म्हणालेत.

सूर्याच्या एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्याच्या क्रियेला संक्रांत म्हणतात. सूर्य वर्ष ३६५.२४२२ दिवसाचे तर चंद्र वर्ष ३५४.३७२ दिवसाचे असते.चंद्र कालगणना ही सुर्यकालगनने पेक्षा ११. २५ दिवसाने मागे आहे.त्यामुळेच आपण ३ वर्षात एक अधिक मास घेऊन 365 दिवस पूर्ण करीत असतो.लीप इयरच्या ह्या फरकाने मकर संक्रांतीच्या तारखात फरक पडत आहेत.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment