पश्चिम महाराष्ट्र

3 मार्च… जागतिक वन्यजीव दिन विशेष

अशी आहे पश्चिम महाराष्ट्रातील वन्यजीव संपदा

3 मार्च… जागतिक वन्यजीव दिन विशेष

अनुराधा कदम

वन्यजीव म्हणजे वनात, जंगलात राहणारे जीव- प्राणी, वनस्पती, कीटक, पक्षी, वृक्ष आणि एकूणच सर्व जीवमात्र. जगभर ३ मार्च हा दिवस ‘जागतिक वन्यजीव दिन’ म्हणून साजरा केला जातो.

 या दिवशी वन्यजीवांचे रक्षण, संवर्धन, त्यांचे अन्नसाखळीतील महत्त्व, वन्यजीवांच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराची आजची स्थिती या विषयावर अनेक गोष्टी बोलल्या आणि लिहिल्या जातात. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या २०१३ च्या अधिवेशनात, ३ मार्च हा दिवस जागतिक वन्यजीव दिन म्हणून घोषित केला गेला.

 वन्यप्राणी आणि इतरही घटकांची शिकार व चोरटा व्यापार यांचे प्रमाण वाढू लागले होते की त्यांपैकी बरेचसे कायमचे नष्ट होतात की काय अशी स्थिती निर्माण झाली होती.

 याबाबत जागृती करण्यासाठी युनो म्हणजेच संयुक्त राष्ट्रसंघाने वन्यजीवन दिवस ठरविला. ‘नामशेष होण्याचा धोका असलेल्या वन्यसृष्टीच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर बंधन आणणारा कायदा’ (कन्व्हेन्श ऑन इंटरनॅशल ट्रेड ऑफ एन्डेजर्ड स्पीशीज ऑफ वाइल्ड फॉना अँड फ्लोरा- लघुरूप ‘साइट्स’ ) ३ मार्च १९७३ रोजी १८० देशांनी मान्य केला म्हणून या दिवसाला महत्त्व आहे.

 या दिवसाच्या निमित्ताने वन्यजीवांचे विविध परीसंस्थातील महत्त्व जाणून त्यांच्या अधिवासाचे आणि त्यांच्या रक्षणाचे, त्यांचे जिणे सुकर करण्याचे, त्यांना असणारे धोके, आव्हाने समजून घेण्याचे आणि त्यांच्यावर होणारे अत्याचार, गुन्हे कमी करण्याचे प्रयत्न केले जातात.

निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या आणि ज्ंगलक्षेत्राने व्यापलेल्या कोल्हापूर, सांगली, सातारा तसेच कर्नाटकच्या सीमारेषेपर्यंतच्या पश्चिम महाराष्ट्रात वन्यजीव संपदा विपुल आहे. या भागात सातत्याने वन्यजीवांच्या अधिवासाला ग्रहण लागू नये यासाठी अभ्यासकांचे काम सुरू आहे.

 शैक्षणिक पातळीवर संशोधनाच्या माध्यमातून नव्या प्रजाती शोधण्यासाठी सकारात्मक प्रयत्न केले जातात. गेल्या काही दिवसात आपल्या नैसर्गिक अधिवासातून बाहेर पडून गवा, बिबटय़ा, रानडुक्कर, हत्ती मानवीवस्तीत घुसत आहेत.

 त्यामुळे ज्ंगलक्षेत्र व मानवी वसाहत यातील सीमारेषांवर अतिक्रमण होणार नाही याबाबत वनविभाग व प्रशासन यांनी अधिक सतर्कपणे काम करण्याची गरज व्यक्त होत आहे. वन्यजीव संपदा ही नैसर्गिक समतोल राखण्यासाठी उपयुक्त आहे. काही दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली या भागातील मानवी वस्तीत गवा घुसला तेव्हा त्याला जेरबद करण्यासाठी वनविभागाची कसोटी लागली.

 अजूनही वनविभागाकडे अशा परिस्थितील गवा, हत्ती, अस्वल, डुक्कर पकडून त्यांना त्यांच्या मूळ अधिवासात सोडण्यासाठी आवश्यक असलेली साधने नाहीत याकडेही प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे.

कोल्हापूर वनविभागाच्या कार्यक्षेत्रात अनेक वन्यजीवांचे वास्तव्य आहे. यामध्ये वन्यप्राणी, वन्यपक्षी, ज्ंगली श्वापद, जलचर यांचा समावेश आहे. वाघ हत्ती गवा फुलपाखरांसाठी हे वनक्षेत्र ओळखले जाते. वनस्पतींनाही वन्यजीव मानले गेले असले तरी अदय़ाप या क्षेत्रातील दुर्मीळ वन्य वनस्पतींची गणना झालेली नाही. संरक्षित क्षेत्रातील वन्यजीवांची नोद असली तरी त्याबाहेरील वन्यजीवांचीही गणना होण्याची गरज आहे.

कोल्हापूर जिल्हय़ात राधानगरी आणि दाजीपूर या दोन मोठय़ा अभयारण्यासोबत कोल्हापूर वनक्षेत्रात प्रामुख्याने कोयना, चांदोली, राधानगरी तिलारी ते आंबोलीपर्यंतचा सलग एकूण 86 हजार 554 हेक्टरच्या वनक्षेत्राचा समावेश आहे. या वनक्षेत्रात अनेक दुर्मीळ वन्य वनस्पतींची नोद आहे.

कोल्हापूर जिल्हय़ात राधानगरी आणि दाजीपूर या दोन मोठय़ा अभयारण्यासोबत कोल्हापूर वनक्षेत्रात प्रामुख्याने कोयना, चांदोली, राधानगरी तिलारी ते आंबोलीपर्यंतचा सलग एकूण 86 हजार 554 हेक्टरच्या वनक्षेत्राचा समावेश आहे. या वनक्षेत्रात अनेक दुर्मीळ वन्य वनस्पतींची नोद आहे.

36 प्रकारच्या वन्यप्राण्यांची नोद

या ज्ंगलात 36 प्रकारचे वन्य प्राणी आहेत. यामध्ये वाघ, हत्ती, बिबटय़ा, लहान हरीण, रानकुवा, अस्वल, गवा, सांबर, भेकर, चौसिंगा, रानडुक्कर, मार्जार कुळातील साळींदर, पाणमांजर, उदमांजर, खवले मांजर, वाघाटी, लंगूर यांचा अधिवास आहे. आंबोलीत पाणमांजर तर तिलारीत लाजवंती या वनमानवाच्या जीवांचाही समावेश आहे.

235पक्ष्यांचा मुक्त अधिवास राधानगरीत

राधानगरी अभयारण्य क्षेत्रात 235 प्रकाराच्या पक्ष्यांची नेाद आहे. तीन प्रकारची गिधाडे या भागात वास्तव्यास आहेत. जगात फक्त पश्चिम घाटात आढळणार्‍या पक्ष्यांच्या दहा प्रकारच्या प्रजातींचे पक्ष या परिसरात आढळतात. यामध्ये शेकरू, निळय़ा शेपटीचा पोपट आणि हॉर्नीबेलच्या चारही प्रजातीचा समावेश आहे.

135 प्रजातीच्या फुलपाखरांची नेांद

राधानगरी अभयारण्यात 135 प्रजातीच्या फुलपाखरांची नोेद आहे. सदर्न बर्डविंग हे भारतातील सर्वात मोठे 190 मिमीचे फुलपाखरू तर सर्वात लहान 15 मिमीचे ग्रास ज्युवेल हे फुलपाखरू या अभयारण्यात आढळते.

 हजारांच्या संख्येने एकत्र जमून स्थलांतर करणारी ब्लू टायगर, ग्लोसी टायगर, स्ट्राइप टायगर ही फुलपाखरे राधानगरी ज्ंगलाची वन्यजीव संपदा वाढवतात.

28 प्रकारचे उभयचर, 100 प्रकारचे सरीसृपही येथे आहेत

सरीसृप गटातील विविध जातीच्या पाली, सरडे, साप, सुरळी देवगांडूळ असे 100 प्रकारचे सरिसृप तर उभयचर गटातील बेडूकही राधानगरी अभयारण्यातील आंबोली, तिलारी, परिसरात अधिवासात आहेत. उभयचरांची संख्या 28 च्या घरात आहेत. पालीच्या नव्या प्रजातीची नोद तर सर्वप्रथम राधानगरीत झाली आहे.

 ऑलीव्ह फॉरेस्ट स्नेक, एरिक्स व्हिटेकरी, पाइल्डबेरी शिल्डटेड या सापांची नोदही येथेच झाली आहे. खैरेचा खापरखवल्या सापही याच ज्ंगलात आढळतो.

तीन वाघ

चांदोली व कोयना परिसरात चार, तिलारीत दोन व राधानगरी परिसरात एका वाघाचे आस्तित्व आढळल्याचे अभ्यासकांचे निरीक्षण आहे. 

ANURADHA  KADAM

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment