कोंकण महाराष्ट्र

विवाहित तरुणाची गळफास लावून आत्महत्या

रत्नागिरी – शहरात २३ वर्षे तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती आली आहे. जिल्ह्यात अलीकडे आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण वाढू लागले असुन दिवसेंदिवस ही एक चिंतेची बाब ठरु लागली आहे. रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथील श्रीनाथ डेअरीमध्ये तरुणाने अज्ञात कारणातून गळफास घेत आत्महत्या केली आहे. या आत्महत्या मागील कारण अद्याप कळू शकलेला नाही, याचा तपास सुरू असल्याची माहिती रत्नागिरी शहर पोलिसांनी दिली आहे.

ही घटना शुक्रवारी  रात्री १. ३० वा. सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शंकरलाल पेमाराम डांगी (२३,मुळ रा. उदयपूर राजस्थान सध्या रा. मारुती मंदिर, रत्नागिरी) असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचा साडू रमेश लखाजी डांगी (४२,मुळ रा. उदयपूर राजस्थान सध्या रा. मारुती मंदिर, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली. त्यानूसार, शुक्रवारी शंकरलाल जेवण करुन रात्री १२.१५ वा. झोपी गेला होता. रात्री १.३० वा. सुमारास त्याची पत्नी तुलसी हिला जाग आली असता तिला शंकरलाल गळफास घेतलेल्यास अवस्थेत दिसून आला. याबाबत शहर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी अधिक तपास रत्नागिरी पोलिस ठाण्याचे हेड कॉस्टेबल कोकरे करत आहेत.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment