अमरावती-जिल्हयात मोठ्या प्रमाणात संत्रा उत्पादक शेतकरी आहेत. सध्या संत्रा तोडीचा हंगाम सुरू आहे. मात्र या हंगामात सध्या ट्रक आणि ट्रॅक्टर वर मजुरांची वाहतूक करत जीवघेणा थरार सुरू असल्याने सर्वसामान्यांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर परतवाडा चांदुर बाजार मोर्शी वरून या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संत्रा उत्पादक शेतकरी आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी संत्र्याची मोठी बाजारपेठ आहे. या तालुक्यांमधून तोडलेला हा संत्रा इतर राज्यासह जगभरात विकला जातो. मात्र संत्रा थोडी वर सुरू असलेल्या जीवघेण्या वाहतुकीमुळे सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
संत्र्याची तोड झाल्यानंतर ट्रक किंवा ट्रॅक्टर मध्ये तो भरून नेला जातो. संत्रा थोडी वर मजुरांची वाहतूक करण्यासाठी ऑटो किंवा इतर साधनांचा उपयोग करणे अपेक्षित असताना या मजुरांची जथ्थे याच भरलेल्या ट्रक मधून वाहून नेल्या जातात. अनेकदा शहरातील मुख्य मार्गापासून पोलिसांची नजर चुकवत सुसाट वेगाने ही जातात. यामुळे अनेकदा अपघात झाल्याची सुद्धा दिसून येते. विशेष म्हणजे अनेकदा पोलीस उभे असताना सुद्धा हे ट्रक आणि ट्रॅक्टर चालक कुठलीही तमा न बाळगता थेट त्यांच्यासमोरून आपले ट्रक आणि ट्रॅक्टर दामटत नेत असल्याचे चित्र आहे.