कोंकण

मेढा भाग हा राष्ट्रवादी पक्षाचा बालेकिल्ला होता, तो राहणारच : खा. सुनील तटकरे

मेढा भाग हा राष्ट्रवादी पक्षाचा बालेकिल्ला होता, तो राहणारच : खा. सुनील तटकरे

रोहा : रविंद्र कान्हेकर

सन 1986 च्या काळात मी तरुण असताना माझ्यावर मेढा भागातील जेष्ठ नागरीकांनी विश्वास टाकला, म्हणून पिण्याच्या पाण्यासह अनेक प्रश्न या भागातील सोडवता आले. त्या कालावधीत संघर्ष होता पण त्याकाळी मेढा भागातील लोकांनी संघर्षाचा तिढा सोडवला.

मधल्या कालावधीत अदिती तटकरे या भागात जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये उभी राहिली तिलाही भरघोस मताधिक्य देण्यात आले. ठमके गुरुजींना संजय गांधी निराधार योजनेच्या कमिटीवर घेतले त्यात गैर काय आहे. एक अभ्यासू नेतृत्व की, जे जेष्ठांची व महिलांची कामे चांगल्या पद्धतीने करू शकतात. काही लोक त्यांना पद मिळणार नाही हे सकाळपासूनच समजल्यावर आपोआप समजून गेले होते.

म्हणून पक्षाची ताकद कमी होणार नाही, मेढा भाग हा पक्षाचा बालेकिल्ला होता आणि तो राहणारच असे विधान खा. सुनिल तटकरे यांनी केले. रोहे तालुक्यातील मेढा गावातील हनुमान मंदीर सभागृह उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी आ. अनिकेत तटकरे, सरपंच स्नेहा महेंद्र खैरे, माजी सभापती राजेश्री पोकळे, तालुका अध्यक्षा प्रितम पाटील, भगवान गोवर्धने, प्रदीप आप्पा देशमुख, अनंत देशमुख, संदीप चोरगे, महेंद्र खैरे, रघुनाथ करंजे गुरुजी, संतोष भोईर

यापुढे बोलताना ते पुढे म्हणाले कि, पंचवीस वर्ष विधिमंडळात मला नेतृत्व करता आले म्हणून या भागातील पाण्याच्या योजनेसाठी मी विधिमंडळात त्या काळात एम आय डी सी कडून पाणी योजना मंजूर करण्यासाठी आवाज उठवला. दोन कोटी पाण्याच्या योजनेचा लोकार्पण सोहळा लवकरात लवकर होईल.

गावाच्या विकासात आत्ताची तरुणाई समरस होते हे पाहून आनंद होत आहे. पक्षाला ताकद देण्यासाठी तुम्ही झटता ते असेच राहून जो भाग कमी पडतो आहे तेथे काम करा असे आवाहन खा. सुनील तटकरे यांनी कार्यकर्त्यांना केले.

शुक्रवारी 8 एप्रिल रोजी मेढा येथे खा. सुनील तटकरेंवर नाव न घेता आ.जयंत पाटील यांनी बोचरी टिका केली होती. याशिवाय राष्ट्रवादीचे खंदे कार्यकर्ते माजी जिल्हा परिषद सदस्य नंदकुमार म्हात्रे व माजी सभापती लक्ष्मण महाले यांनी शेकापमध्ये प्रवेश करत खा. सुनील तटकरे, आ अनिकेत तटकरे यांच्यावर नाराजीची तोफ आपल्या वाणीतून अवचितगडाच्या पायथ्याशी डागली होती. मात्र खा. सुनील तटकरेंनी शेकापत गेलेल्या कार्यकर्त्यांना सभेत महत्वही दिले नाही असे दिसून आले.

राष्ट्रवादी पक्षाचे काम आम्ही अविरत करत आहोत.
गेले ते कावळे व राहिले ते मावळे असे म्हणत मेढा भाग खासदार तटकरेंच्या सदैव पाठीशी राहील असे सांगितले.अवचितगडाच्या पायथ्याशी आमच्या गावाची वस्ती आहे, सतत दरड कोसळणे हे प्रकार घडतात त्यावर बंदोबस्त होईल याची सोय करावी, याशिवाय आरोग्याची सुविधा, उपचार केंद्र, ग्रंथालय अश्या सुविधा गावात कराव्यात अशी मागणी भगवान गोवर्धने यांनी ग्रामस्थाच्या वतीने केली.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment