विदर्भ

मासिक पाळी जनजागृती व सॅनिटरी नॅपकिन वाटप

मोर्शी – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक युवती विचार मंच महाराष्ट्र राज्य वर्धापन दिनानिमित्त भारतीय महाविद्यालय मोर्शी येथे भाग्योदय फाउंडेशन, अमरावती व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक युवती विचार मंच महाराष्ट्र राज्य. या अशासकीय संस्थेमार्फत किशोरवयीन मुलींकरीता मासीक पाळी विषयी जनजागृती, मोफत सॅनीटरी पॅडचे वितरण,गुडटच – बॅडटच बद्दलची माहिती आणि विविध महत्वपूर्ण शासकिय योजनांबद्दल माहिती पुरविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला होता. यावेळी महाविद्यालयाचे मुख्याध्यापक बांभुळे , टेंभुर्णे ,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक युवती विचार मंच महाराष्ट्र राज्य सचिव जान्हवी राऊत, भाग्योदय फाऊंडेशनचे सदस्य अंकुश पंढरीपांडे,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवती विचार मंच मोर्शी तालुका उपाध्यक्ष धनश्री रोडे,युवती विचार मंच वर्धा जिल्हा सहप्रवक्त्या वैभवी भार्गव व मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होते.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment