पुणे – बायकोला दारू पिऊन सतत मारहाण करून शिवीगाळ तसेच बायकोच्या घराच्यांकडच्याना नेहमी शिव्या देणे या त्रासाला कंटाळून मेव्हण्याने दाजीचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना समोर आली आहे. कोणातही ठोस पुरावा आणि शर्ट वरून आरोपींची ओळख पटवून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी सतीश रामभाऊ गिर्हे (रा. शीतलादेवी मंदिराजवळ म्हाळुंगे), दीपक विठ्ठल कोळेकर (रा. पॅनकार्ड क्लब रोड, चाकणकर चाळ बाणेर) या दोघांना अटक केली आहे. दोघे साडूभाऊ असून, त्यांच्याविरुद्ध चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप शंकर शिंपी (रा. पॅनकार्ड क्लब रोड, धनकुडे चाळ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून ही घटना २८ डिसेंबरला सुस खिंडीत घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,बाणेर परिसरात संदीप शिंपी हे रहात होते. त्याला दारूचे व्यसन असल्याने ते सतत बायकोला शिवीगाळ करून मारहाण करत होते. तसेच मेव्हण्याला आणि त्याच्या घराच्याना शिवीगाळ करत असे. या सततच्या त्रासाला कंटाळून मेव्हन्याणे दाजीचा काटा काढण्याचे ठरवले. त्यानुसार त्याने त्याचा साडूभाऊ दीपक याला सोबत घेऊन, रात्री दारू पिल्यानंतर मेव्हणा शिंपी याला दुचाकीवर बसवून सूस खिंड येथील एका निर्जनस्थळी नेले. तेथे भांडण करुन तेथेच त्याच्या डोक्यात दगड घालून खून केला. घटना स्थालावरून आरोपी पसार झाले होते.
याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सुस खिंडी परिसरात पोलिसांना एक अनोळखी मृतदेह सापडला. मृतदेहाची ओळख पटवली जाईल असा एकही पुरावा पोलिसांकडे नव्हता. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केल्यानंतर त्यांना सुगावा सापडला. मृताच्या हातावर एस नावाचा टॅटू होता. तसेच अंगावर मॅरेथॉन स्पर्धेतील टी शर्ट होता. त्यानुसार पोलिसांनी माहिती काढत त्याच्या कुटुंबियांपर्यंत पोहचले, तेव्हा पोलिसांना तो घरी आलाच नसल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी शोध सुरू केला. तो एका बुलेट वाल्यासोबत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांनी शोध घेत त्याला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्हा कबूल केला.
माझ्या बहिणीला दारू पिऊन सतत मारहाण करून शिवीगाळ करत होता. तसेच माझ्या घरच्यांना देखील दारूच्या नशेत शिवीगाळ करून दमदाटी करत होता. त्यावरून आपण त्याचा डोक्यात दगड घालून खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.