मुंबई

सायबर गुन्हेगारीवर अंकुश ठेवणार – मिलिंद भारंबे

नवी मुंबई- पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंग यांची बदली झाली असून त्यांच्या जागी विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा सुव्यवस्था महाराष्ट्र ) मिलिंद भारंबे यांची नियुक्ती झाली आहे. आयुक्तांची बदली आणि नवीन आयुक्त कोण येणार ह्या प्रश्नांची चर्चा अनेक महिन्यापासून नवी मुंबई पोलीस दलात सुरू होती. मात्र ह्या चर्चेला बुधवार ता.१४ रोजी ह्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. ज्येष्ठ नागरिक आणि महिला सुरक्षेवर अधिक भर देणार असून संघटित गुन्हेगारी आणि सायबर गुन्हेगारीवर अंकुश ठेवणार असल्याचे नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सांगितले. बुधवारी संध्याकाळी सूर्य मावळत्यावेळी आयुक्त बीपीनकुमार सिंग यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला.

विशेष पोलीस महानिरीक्षक कायदा सुव्यवस्था विभागाचे मिलिंद भांबरे यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त म्हणून बुधवारी संध्याकाळी त्यांनी पदभार स्विकारला. आणि त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधत असताना सांगितले की, शहरातील नागरिकांना हे शहर सुरक्षित वाटावे या साठी प्रयत्न करणार असून जेष्ठ नागरिक आणि महिला सुरक्षेला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. तसेच संघटित गुन्हेगारीवर आळा घालणार असल्याची माहिती दिली. सायबर गुन्हेगारीत होणाऱ्या वाढीबाबत त्यांनी चिंता व्यक्त करीत या बाबत ठोस उपाययोजना आणि जनजागृती वर भर देणार असल्याचे सांगितले. हे शहर त्या मानाने शांत असले तरी वाढती व्हाइट कॉलर गुन्हेगारी , घरफोडी वाहन चोरी हे आव्हान असल्याचे सांगत हे आव्हान मोडून काढणार झल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment