विदर्भ

मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सर्व पक्षीयांनी केला निषेध

मोर्शी – भारतीय जनता पार्टी चे माजी प्रदेशाध्यक्ष तथा शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भिक मांगुन शाळा चालविल्या असे वादग्रस्त विधान नुकत्याच पैठण येथे केलेले होते. त्याचा निषेधार्थ दिनांक १० डिसेंबर रोजी मोर्शी शहरातील जयस्तंभ चौक येथे निदर्शने करण्यात आले तसेच चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात नारेबाजी, घोषणाबाजी करून फुले, शाहु, आंबेडकरवादी सर्व पक्षीयांन तर्फे निषेध करण्यात आला.याप्रसंगी देवेंद्र खांडेकर, भुषण कोकाटे, प्रदीप इंगळे, देवा मोहोड, अशोकराव गायकवाड, विजयराव वानखडे, वसीम कुरेशी, राजा बडोदेकर ,भुषण राऊत, राजेंद्र लाखोडे,आनंद नगरकर , तसेच इतर अनेक आंबेडकरवादी विचारधारेचे कार्यकर्ते उपस्थित होते तसेच इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment