महाराष्ट्र मुंबई

वृद्ध व्यक्तीचे अल्पवयीन मुलीसोबत गैर कृत्य

पनवेल – मधील सुकापुर या ठिकाणी एका ६० वर्षीय व्यक्तीने आपल्याच शेजारील एका ११ वर्षीय मुलीला आपल्या खोलीत प्रसाद देण्याच्या बहाण्याने बोलावून तिच्या सोबत लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इमारती मधील इतर मुलांना प्रसाद दिल्यावर पीडित मुलीला आपल्या खोलीत बोलावले आणि तिच्या सोबत गैर कृत्य केले, मुलगी नाराज असल्याचे समजताच आईने विचारल्यावर मुलीने सर्व प्रकार सांगितला. मुलीच्या वडिलांनी तात्काळ खांदेश्वर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात असून, पोलीस अधिक तपास करत आहेत…

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment