विदर्भ

दोन दिवसापासून बेपत्ता युवती सापडली घरीच, पण…..

अमरावती – उच्च शिक्षित युवतीचा तिच्या घरातीलच पाण्याच्या टाकीत संशया स्पद मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.. 28वर्षीय अश्विनी गुणवंत खांडेकर राहणार रत्नदीप कॉलनी अर्जून नगर असे मृत युवतीचे नाव आहे.. शनीवारी सकाळीं तोंड धुत असताना घरच्यांना पाण्यातून दुर्गंधीयुक्त वास आला.. टाकीत जावून पाहिले असता अश्र्विनीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली..
अश्विनी उच्च शिक्षित होति तीने इंजिनियरिंग केलें होतें.. या शिवाय तीने मुंबई दिल्लीत जावून आर्टीटेकट सुद्धा केले होते… वडील सेवानिवृत्त शिक्षक होतें त्यांचा मृत्यु झाल्यानें घरात अश्विनी तीचा भाउ सह आई एकत्र राहत होती.. भाऊ डांस चे क्लास घेतं आहे.. अश्विनी 28नोव्हेंबर पासुन बेपत्ता असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.. ती बेपत्ता झाल्याची तक्रार 30 नोव्हेंबर ला गाडगे नगर पोलीस स्टेशन ला नातेवाईकांनी दाखल केली होती..
घटनेची माहिती मिळताच प्रभारी शहर पोलिस आयुक्त सुधीर हिरेमठ डि सी पी पाटिल, ए सी पी पूनम पाटील गुन्हे शाखा पोलीस निरिक्षक अर्जून ठोसरे, गाडगे नगर पोलीस निरिक्षक आसाराम चोरमले दाखल झाले.. घटनास्थळी सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी घटना स्थळ ची पाहणी करुन नातेवाईकांना विचारणा केली.. घटनास्थळी डॉग स्कोड सह फिंगर प्रिंट पथक दाखल झाले.. पोलीसांनी दोन तासानंतर युवतीचा मृतदेह पाण्याच्या टाकीतून काढून शव वीच्चेदनास जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले.. उच्च शिक्षित अश्विनी ने आत्महत्या का केली.. मृत्यु मागे नेमके कोणते कारण असावे याचा शोध पोलीस घेत आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment